इतर

उद्योजक नानजीभाई ठाकूर हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे – राजेंद्र गवांदे ‌‌.

अकोले (प्रतिनिधी)

मुंबई चे उद्योगपती सन्मा- नानजीभाई ठाकुर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने,,,, अकोले तालुक्याचे सुपुत्र,,, पत्रकार विश्वासराव आरोटे‌ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कळस गावचे सुपुत्र विद्यमान सरपंच मा. राजेंद्र गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोले येथील मार्गदाता विद्यार्थी वस्तीगृह येथील मुलांना एक वही एक पेन भेट देन्यात आले .

या वस्तीगृहाला ऑफिस मध्ये भिंतीवर लावण्यासाठी एक
घड्याळ देखील देण्यात आले . वस्तीगृहाचे अधिक्षक सन्मा- गोरक्षनाथ खरात सर यांनी घड्याळाचा स्वीकार केला .
या छोटेखाणी कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते मा सुरेशराव देठे‌ साहेब, वाशेरे गावचे सुपुत्र तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मा रमेशराव शिरकांडे ,कवी अशोकराव शिंदे हे उपस्थित होते! उपस्थित मान्यवरांनी उद्योजक नानजीभाई ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . त्यांच्या सामाजिक कार्याविषयी सरपंच राजेंद्र गवांदे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना माहिती दिली . विद्यार्थ्यांच्या जीवनात नानजीभाई ठाकूर हे खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करत आहेत . समाजाने नानजीभाई ठाकूर यांची प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे असे देखील सूचित केले . या वेळी विद्यार्थ्यांनी ,’एकदा नानजीभाई ठाकूर यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली” . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, गरजूंना वह्या पुस्तके वाटप करणे आदी कार्यक्रम मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचे माध्यमातून सुरु असते .या उपक्रमासाठी नानजीभाई ठाकूर योगदान देत असतात . म्हणूनच उद्योजक नानजीभाई ठाकूर यांचा वाढदिवस प्रेरणादायी असल्याचे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button