इतर

रणंद खु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना परस बागेचे प्रशिक्षण!

शाळेच्या परसबागेत आंबा, पेरु, लिंबू, शेवगा,

गवती चहा, चिकू, अंजीर, हादगा, कडीपत्ता,

मेथी, शेपू, कोथांबिर, वाल रोपांची लागवड

एस के जाधव

कोकणवाडी ता.अकोले दि 7

अकोले तालुक्यातील रणंद खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना परसबागेचे प्रशिक्षण देण्यात आले ,

ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणद खुर्द येथे परसबाग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते

बायफचे श्री. राम कोतवाल यांनी परसबागेचे महत्व, लागवड, परसबागेचे प्रकार, जसे हंगामी परसबाग, बहुवर्षायू परसबाग तसेच कंदवर्गीय, वेलवर्गीय, मूळवर्गीय, शेंग वर्गीय, पालेभाज्या, तसेच रानभाज्या इ विषयावर सविस्तरपने माहिती देऊन लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यासाठी भर देणे, आळेभर, झाडांना आधार देणे, याचे ट्रेनिंग देण्यात आले. शाळेत सुंदर अशी परसबाग लागवड करण्यात आली.

शाळा हे एक विकासाचे केंद्र बिंदू म्हणून ओळखले जाते. तसेच एक चांगले उदाहरण म्हणून रणंद खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे बघितले जाते. शाळेत परसबागेत आंबा, पेरु, लिंबू, शेवगा, गवती चहा, चिकू, अंजीर, हादगा, कडीपत्ता, मेथी, शेपू, कोथांबिर, वाल इत्यादी रोपांची लागवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, मच्छिंद्र मुंढे, निलेश आळवने यांनी केले.
हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कातडे , उपध्यापिका हिरा देशमुख मॅडम यांनी विशेष परिश्रम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button