इतर

राजूर येथील रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयात गणित विज्ञान प्रदर्षण संपन्न

विज्ञानामुळे दळणवळण आणि तंत्रज्ञान वेगाने वाढले – विजय पवार


अकोले/प्रतिनिधी
श्रद्धा असावी परंतू अंधश्रद्धा नसावी.विज्ञानामुळे अंधश्रद्धा कमी झाली. अंधश्रद्धेकडे न पहाता विज्ञानाकडे वळा. कारण विज्ञानामुळे दळणवळण आणि तंत्रज्ञान वेगाने वाढले.असे विचार सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक विजय पवार यांनी प्रतिपादीत केले.
राजूर येथील सत्यनिकेतन संस्थांतर्गत गणित विज्ञान प्रदर्षण गुरूवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे संपन्न झाले.या प्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


यावेळी संचालक विलास पाबळकर, शिक्षण निरिक्षक लहानू पर्बत,प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख, खिरविरे विद्यालयाचे प्राचार्य मधुकर मोखरे,शेणित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक युवराज गभाले, सदाशीव गिरी,प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक गोरक्ष मालुंजकर यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पवार यांनी पुढे मार्गदर्शन करताना आजचे युग हे विज्ञान युग असल्याने विज्ञानामुळे देशाची प्रगती झाली.नाविन्यता यातूनच स्वतःला आनंद मिळतो. विद्यार्थी सर्वांगीन विकास करण्यासाठी गणित व विज्ञान प्रदर्षणाची आवश्यकता असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी लहानू पर्बत, डॉ.बी.वाय. देशमुख,मधुकर मोखरे, सदाशीव गिरी,रविंद्र मढवई यांनी आपले विचार व्यक्त केले.


या प्रदर्शनात सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विद्या मंदिर राजूर,खिरविरे, कातळापूर,आश्रमशाळा शेणित आदी शाळांतील इयत्ता ५ वी गटात विज्ञानाचे ७ व गणिताचे ४, इयत्ता ६वी ते ८ वी या गटातील विज्ञानाचे ३४ व गणिताचे १३ तसेच इयत्ता ९वी ते १२वी या गटातून विज्ञानाचे ५४ व गणिताचे ७ याप्रमाणे भूगोल विषयासह जलशुद्धीकरण,किशोरी कम पोल्ट्री प्रोजेक्ट, पवनचक्की, ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप सूचक यंत्र,समांतर रेषा व गुणधर्म,त्रिकोण व बाहयकोन गुणधर्म, गुरुत्वाकर्षण विरोधी क्रेन यांसारख्या एकूण १२० उपकरणांचा सहभाग होता.


धामणवन विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन वाकचौरे, चिंचवने विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास तेलोरे यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक व स्वागत उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे यांनी केले. सुत्रसंचलन कविता वाळुंज यांनी केले तर प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button