कृषी

शिवपाणंद रस्त्यां साठी नागपुर हिवाळीअधिवेशनात पेरू वाटप करणार – पवळे


राज्यातील सर्व शिवरस्त्यांचे एक वर्षात हद्द निश्चितीसह मजबुतीकरण करा

अहिल्यानगर – राज्यातील शेतरस्त्यांचा ज्वलंत प्रश्न गंभीर बनत असुन शेतकऱ्यांनी जमिनी गमावल्या, मुले शिक्षणापासून वंचित,शेतमालाचे नुकसान, फौजदारी स्वरूपाच्या घटना यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीतर्फे नागपुर हिवाळी अधिवेशनात भव्य लक्षवेधक पेरू वाटप केले जाणार आहेअसल्याचे या चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले

यावेळी राज्यातील सर्व आमदार आणि मंत्री यांना “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” टोप्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये शासननिर्णयांच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचे मुद्दे अधिवेशनात मांडले जातील.

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या मुख्य मागण्या:

  1. महाराष्ट्रातील सर्व शिवरस्ते एक वर्षाच्या आत हदद निश्चित/खुले करून, ग्रामसडक योजनेअंतर्गत मजबुतीकरण तात्काळ करावे.
  2. शासन निर्णयाची कालमर्यादा पाळत नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
  3. दीर्घकालीन शेतरस्ता मजबुतीकरणासाठी स्वतंत्र मंत्रालय/शिव पाणंद शेतरस्ता समग्र बळकटीकरण योजना नागपुर हिवाळी अधिवेशनात मंजूर करावी.
  4. तहसीलदारांनी आदेशीत केलेल्या निर्णयांचे पालन उपविभागीय अधिकारी/जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुनिश्चित करावे; शासनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
  5. प्रत्येक गावोगावातील ग्रामशेत रस्ता समित्यांचा दर तीन महिन्यांनी पारदर्शक अहवाल घेऊन आवश्यक कारवाई सुचवावी.
  6. गावोगावातील सर्व शेतरस्त्यांचे सिमांकन (वहिवाट/पाऊलवाट) एक वर्षाच्या आत करून नोंद घेऊन मजबुतीकरण करावे.
  7. प्रलंबित शेतरस्ता प्रकरणे निकाली काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत प्रत्येक तीन महिन्यांनी आयोजित करावी आणि तडजोडीमार्गे निर्णय घेणे सुनिश्चित करावे.
    या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, गृहविभाग यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदन सुपूर्द करताना महसूलचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड. सागर जोरी, जेष्ठ पत्रकार शिवाजी राऊत, शांताराम पानमंद, सचिन शेळके, रामहरी बोंबे, दशरथ वाळूंज, संजय साबळे, सुरेश भुजबळ, भाऊसाहेब वाळूंज, बबन गुंड, संजय जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

– शिव पाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर सरकार प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी नागपुर विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्षवेध पेरू वाटप अभियान राज्यातल्या सर्व आमदारांना शेतरस्ता जागृती टोपी पेरू व लक्षवेधीसाठी पत्रक वितरण करून विधानभवन प्रांगणात सह्यांची मोहीम घेवून चळवळीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार

शरद पवळे

( प्रणेते,महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button