शेणित येथे राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालया मार्फत राबविली स्वच्छता मोहीम..

एस. के. जाधव
प्रतिनिधी कोकणवाडी दि.४
गुरुवर्य ह. भ. प. माधव महाराज घुले यांच्या प्रेरणेने चालत आलेला गीता जयंती व दत्त जयंती उत्सवानिमित्त शेणीत येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त राजा हरिश्चंद्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले
गावातील मारुती मंदिर आणि श्री दत्त मंदिर परिसरातील कचरा उचलून त्याचे व्यवस्थापन केले व झाडलोट करून स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबर गावकरी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छतेत परमेश्वर असतो म्हणून स्वच्छता ही स्वतःपासून सुरू करावी. ‘एक कदम स्वच्छता की और’ असे ही ते म्हणाले. स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या भव्य सभा मंडपात विद्यार्थ्यांना चहापाणी देण्यात आला. पूजा लोहकरे, कल्याणी लोहकरे, रेश्मा लांघी, वैष्णवी घाटकर, वंदना लोखंडे या विद्यार्थिनींनी संतांचे अभंग व गवळणी म्हटल्या.

या वेळी श्री पुनाजी लोहकरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर, महादर्पणचे प्रतिनिधी श्री संतु जाधव, श्री घनश्याम नवले, श्री तुकाराम बेनके, श्री विजय बडे, श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, श्री पोपट भांगरे, बायफचे श्री तारकराम, समस्त गावकरी, गुरुदत्त भजनी मंडळ उपस्थित होते.




