रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला एक दिवस स्वप्नातला ….

नाशिक दि ९
रोटरी क्लब ऑफ नाशिक ने रामशेज माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आशेवाडी( ता. दिंडोरी ,जिल्हा नाशिक) येथील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेरणा प्रेरणादायी व नावीन्यपूर्ण असा *एक दिवस स्वप्नातला* या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हॉटेल बी एल व्ही डी येथे दिवसभर भरगच्च अशा आयोजित या कार्यक्रमात डॉ. विश्वजीत दळवी यांनी मुलांना दातांची निगा कशी राखावी, याबद्दल अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. बी एल व्ही डी या हॉटेलच्या स्टाफ ने मुलांना संपूर्ण हॉटेल दाखवून त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाबद्दल सविस्तर माहिती दिली. अॅड .राजेश्वरी बालाजी वाले यांच्या मार्गदर्शनाखाली *पावसाचा निबंध* हा बोधपर चित्रपट दाखविण्यात आला. शितल तन्ना व जयेश तन्ना यांनी मुलांना ‘भयमुक्त स्वातंत्र्य’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले डॉ. अनिता नेहते व त्यांच्या सहकाऱ्यांनी CPR यांचे प्रात्यक्षिक देऊन मुलांकडून मॅनीक्वीन वर प्रत्यक्ष करून घेतले.

चेतन बुरांडे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व विशद करून व्यवसाय मार्गदर्शन केले.
डॉ. स्वप्निल विधाते, डॉ. नेहा मेहेर (विधाते ),डॉ. विश्वजीत दळवी डॉ. श्रिया कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांनी मुलांचे नाक, कान घसा, डोळे व दात सहीत संपूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी करून त्यांनी कोणते उपचार करावेत याबद्दल मार्गदर्शन केले.
शेवटी मुलींनी विविध वेशभूषा करून डीजेच्या तालावर वेगवेगळे आदिवासी नृत्य सादर केले.
फ्रावर्षी इंटरनॅशनल स्कूलच्या इंटर अॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी या दिवसभर या कार्यक्रमासाठी दिवसभर स्वयंसेवक म्हणून काम केले. त्यांनी मुलांना डिक्शनरीचा वापर कसा करावा याची माहिती देऊन त्यांना डिक्शनरी भेट दिली. हॉटेलचे उपाध्यक्ष श्रीराम सर यांनी मुलांना हॉटेल तर्फे मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ नाशिकने ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला.
शिल्पा पारख, रामनाथ जगताप, चेतन पवार, शितल तन्ना ,लीना बाकरे ,राजेश्वरी बालाजीवाले यांनी विद्यार्थ्यांना विविध भेटवस्तू दिल्या. मुलांना आणण्या आणण्यासाठी म्हणून दादा देशमुख यांनी बसेसची व्यवस्था केली होती.
रोटरी क्लब ऑफ नाशिक ने सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व जेवणाची सोय केलेली होती.
कार्यक्रमास ज्ञानेश्वर शेवाळे, डॉ. गौरव सामनेरकर,रोहित देशपांडे प्रणाली देशपांडे अॅड. विद्युल्लता तातेड, सुहास कुलकर्णी, गौरी पाठक ,मकरंद चिंधडे,चेतन पवार ,अमित पगारे ,विक्रम बालाजी वाले, सुरेखा राजपूत आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोना सामनेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


