इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२२/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०२ शके १९४७
दिनांक :- २२/०१/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१६,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २६:२९,
नक्षत्र :- शततारका समप्ति १४:२७,
योग :- वरीयान समाप्ति १७:३८,
करण :- वाणिज समाप्ति १४:४१,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०५ ते ०३:२९ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:०६ ते ०८:२९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:४१ ते ०२:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०५ ते ०३:२९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५२ ते ०६:१६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी (शिवपूजन), गणपतीस तिळाचा लाडवाचा नैवेद्य दाखवावा, भद्रा १४:४१ नं. २६:२९ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०२ शके १९४७
दिनांक = २२/०१/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रमंडळींच्या सहवासात रमाल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करावा. रागाला आवर घालावी.

वृषभ
भावंडांच्या सहवासात खुश असाल. आवडते साहित्य वाचायला मिळेल. लहान प्रवास मजेत होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

मिथुन
गायन कलेची आवड जोपासाल. अधिकार वाणीने बोलाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. तुमच्यातील उर्जेचा योग्य वापर करावा. नवीन अधिकारांचा वापर कराल.

कर्क
उत्कृष्ठ तर्कपद्धती वापराल. जास्त चिकित्सा करू नका. आपले मत योग्यरीतीने मांडाल. भावनेच्या आहारी जावू नका. मित्रांच्या रागाला सामोरे जावे लागेल.

सिंह
हेकेखोरपणा करू नका. कामातील अडथळे दूर करावेत. पित्ताचा त्रास जाणवेल. चिडचिड करू नका. वादात अडकू नका.

कन्या
लहान मुलांशी मैत्री कराल. गप्पांमधून जवळीक वाढवाल. पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. आवाक्याबाहेरील खर्च टाळावेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ
जोडीदाराचे प्रभुत्व राहील. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.

वृश्चिक
तुमच्या बोलण्यावर इतर खुश होतील. धोरणीपणाने वागाल. निसर्गरम्य वातावरणात रमाल.काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल.

धनू
कफविकाराचा त्रास जाणवेल. अतिविचार करू नयेत. तुमच्या अनुमानाला निश्चिती येईल. रेस, जुगार यांतून फायदा संभवतो. करमणुकीच्या कार्यक्रमात रमाल.

मकर
पत्नीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक कराल. व्यवहारकुशलता दर्शवाल. कामाचा ताणामुळे दुरावा वाढवू शकतो. घरातील वातावरणात रमून जाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

कुंभ
विश्वासास पात्र व्हावे. खोट्याचा आधार घेवू नका. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. कामाची धावपळ राहील. मनाची संवेदनशीलता दाखवाल.

मीन
कौटुंबिक प्रभुत्व दाखवाल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
📞 8411935533
9561947533

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button