गणेश जयंती निमित्त गातेस बु (ता. वाडा) येथे अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता

एस के जाधव
महादर्पण प्रतिनिधी
ह.भ.प. समीर महाराज नेहरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे यावर्षी ही गणेश जयंती निमित्त गातेस बु.॥ (ता. वाडा) जि. पालघर येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. संपत महाराज भोर गुरुजी (रा. अंबड ता.अकोले जि. अहिल्यानगर) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अणिकांचे काम नाही आता ‘ या अभंगावर नामाचे महत्त्व, संतांनी एक दैवतवादाच्या पुरस्काराचा स्वीकार कसा केला, वारकरी धर्मामध्ये संघटन आणि चळवळीला संतांनी कसे महत्त्व दिले हे पटवून सांगितले. एक उत्तम शिक्षक कीर्तनकार आणि नाममात्र मानधनावर समाज प्रबोधन करणारे भोर महाराज यांचे माजी गटशिक्षणाधिकारी श्री बाराथे साहेबांनी कौतुक केले. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग, संतांचे ऐतिहासिक कार्य, सामाजिक व पुरोगामी विचार ग्रामस्थांनी समजून घेतला .

याप्रसंगी माजी गटशिक्षणाधिकारी श्री बाराथे , शिक्षक श्री दिनेश गोतरणे, शिक्षक नेते श्री राजू महाले, बहुसंख्य शिक्षक वृंद, वारकरी संप्रदाय, चेअरमन व सदस्य सेवा सहकारी सोसायटी, तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, सदस्य, गणेश मंडळ, महिला मंडळ, जीवन ज्योत युवा मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.



