गावठी बी- बियाण्यांचे आणि निसर्गाचे जतन करा- पदमश्री राहिबाई पोपेरे

अकोले प्रतिनिधी
गावठी बी- बियाण्यांचे आणि निसर्गाचे जतन करा असे आवाहन बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले
भोजनेवाडी (अबिटखिंड) ता. अकोले येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होते स्व. बुधाबाई नामदेव भोजने यांच्या स्मृतिदिना निमित्ताने परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व विविध झाडां च्या रोपांचे वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या

निसर्गाचे रक्षण खऱ्या अर्थाने आदिवासींनी केले आहे यापुढे निसर्ग आणि गावठी बियाण्यांची जतन करण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे असे त्यांनी सांगितले
आदर्श माता कै. बुधाबाई नामदेव भोजने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राहिबाई पोपेरे यांनी त्यांना अभिवादन केले याप्रसंगी ह.भ.प.तुकाराम महाराज आरोटे यांचे संगीत प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला

यावेळी शरद प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार (सातारा), श्री कदम साहेब (मुंबई,) कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख , पत्रकार सुनील गीते सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झडे, अबितखिंड च्या सरपंच यमुना घनकुटे, माजी सरपंच भानुदास गोडे, मुख्याध्यापक श्रीमती पडोळे मॅडम, शिक्षक लालू भांगरे, कैलास राऊत,बाळासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी यावेळी बिजमाता राहिबाई पोपेरे यांचा शाल श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सन्मान केला
यावेळी संगमनेर अकोले पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डी. एम. भांडकोळी, वसंत घनकुटे, अमोल भांगरे,भोजनेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


