राजश्रीताई घुलेंच्या प्रयत्नांतून रांजणीला कोट्यवधींची विकासकामे – सरपंच मनिषा घुले

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील रांजणी येथे नामदार राजश्रीताई घुलेंच्या विषेश प्रयत्नांतून कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागले आहेत. गावात नळ योजनेद्वारे व वाडी-वस्तीवर शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेतून कोट्यावधी रुपयाची योजना शासन स्तरावर मार्गी लागण्यासाठी नामदार राजश्रीताई चंद्रशेखर घुले यांनी विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती सरपंच मनीषा घुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रासिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे कि, नामदार राजश्रीताई घुले यांच्या विशेष प्रयत्नांतून गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. रांजणीला ५० लाख निधीच्या ५ वर्गखोल्या, १५ लाख रुपये भुयारी गटार योजनेसाठी, ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी १५ लाखाचा निधी दिला आहे. १५ लाख गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी, १० लाख स्मशानभूमी कंपाउंड व शेड दुरुस्तीसाठी, गावातील पाणी पाणीपुरवठा ताबडतोब सुरळीत होण्यासाठी पाणी टाकी पाईप लाईन बोअरवेल मोटार दुरुस्तीसाठी व आरो प्लांटसाठी १० लाख रुपये निधी तसेच रांजणी खामगाव रस्ता खडीकरण यासाठी 9 लाख रुपये मंजूर केले आहेत. हनुमान मंदिर पिंपरीशहाली रोड ते कर्डिले वस्ती खडीकरण व डांबरीकरणासाठी ३० लाखांचा निधी दिला आहे. तसेच रांजणी – पिंपरी शहाली रोड खडीकरणासाठी ९लाख निधी मंजूर केला आहे. तसेच गावातील पाच ते सहा रस्त्याचे खडीकरणासाठी निधी मंजूर करण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती उपसरपंच उषा पवार यांनी दिली. रांजणी हे गाव स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या विचाराचे गाव आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाच ते सहा कोटी कर्ज घेऊन मंजूर केल्यामुळे संपूर्ण गाव मुळा धरण व जायकवाडी पाईपलाईन मुळे 80% गाव बारा महिने बागायत झाले आहे. माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील यांनी आमदारकीच्या काळात वीज-पाटपाणी, गावाला जोडणारे रस्ते विशेष प्रयत्नातून पूर्ण केले आहेत. पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितीज घुले यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील पेव्हरब्लॉक, दलित वस्ती भुयारी गटार, हायमॅक्स यासारख्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत.