इतर

रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित व्होकेशनल अवॉर्ड प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

नाशिक प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित व्होकेशनल अवॉर्ड प्रदान समारंभ उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

स्व. श्रीमती मंगल गोखले आणि स्व. श्रीमती शालिनी देवधर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी रोटरी व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करण्यात येत असतात. हा समारंभ रोटरी कम्युनिटी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जोगेंद्रसिंग मोतीसिंग बीसेन उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. गौरव सामनेकर होते.

यावेळी सौ. रीना मानव मल्होत्रा, सतीश सूर्यवंशी, डॉ. स्वप्निल विधाते, डॉ. अतुल पुराणिक, आढव शैला पुंडलिक, डॉ. नागेश मदनुरकर व उदय खेडकर आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेकर यांनी केले. सेक्रेटरी सीए रेखा पटवर्धन यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय हेमराज राजपूत यांनी करून दिला. व्होकेशनल अवॉर्ड कमिटीचे चेअरमन म्हणून सुजाता राजेबहादूर यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन रोटे. स्मिता अपशंकर व सागर बधाणे यांनी केले, तर रेखा पटवर्धन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोना सामनेकर, रोहित देशपांडे, मुकेश भामरे व प्रणाली देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मकरंद चिंधडे, मनीष चिंधडे, अनिल सुकेनकर, ओमप्रकाश रावत, रवींद्र महादेवकर, हेमराज राजपूत, राजेश्वरी बालाजीवाले, संदीप नेरकर तसेच फ्रवाशी अकॅडमीच्या प्राचार्या डॉ. मंजू सुरेंदरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी सन्मानित व्यक्तींच्या कार्याचे कौतुक करून रोटरीच्या सामाजिक उपक्रमांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button