वाकी (ता अकोले )येथे शिक्षण परिषद संपन्न

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी दि. २५ अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी येथे केंद्रप्रमुख श्री सुनील घुले यांच्या अध्यक्षतेखाली सहावी शिक्षण परिषद पार पडली.
सुलभक श्री अर्जुन तळपाडे यांनी PAT रिपोर्ट व विश्लेशन आणि कृती कार्यक्रम या संबंधातील मार्गदर्शन केले. त्याचबरोबर निपून भारत आणि पॅट मधील फरक स्पष्ट करून दाखवला. शाळा स्तरावर पॅटचे रेकॉर्ड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तसेच निपूनच्या अंतर्गत शंभर टक्के वर्ग प्रगत असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी स्वीपचॅटआणि लिंकचा वापर करून अचूक माहिती दिली.
श्री दिपक होलगीर यांनी परिसर अभ्यास, समाजशास्त्र याचे अध्ययन अध्यापनाचे अनुभव सांगीतले. गटकार्यातून कृती करून घेतली. येणाऱ्या समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पती बद्दल सहसबंध पटवून सांगीतले.
अध्ययन अनुभवात प्रत्यक्ष अनुभव मुलांना कसा द्यायचा हे सांगीतले. कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देऊन अध्ययन अध्यापन उत्तम कसे करावे याविषयी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयाशी निगडित असलेला अतिशय महत्त्वपूर्ण असलेला प्रश्नपेढी हा घटक कसा हाताळावा याबाबत विद्यार्थ्यांचा वयोगट आणि विषय या सर्व घटकांचा विचार करून प्रश्नपेढी स्वतःच्या हस्ते तयार करताना अध्ययन निष्पत्ती आणि आकारिक, संकलित मूल्यमापन या सर्वांना महत्व देऊन प्रश्नपेढी तयार करावी.
मूल्यवर्धन या विषयावर श्री गणेश पिचड यांनी मार्गदर्शन केले. पूरक वाचन हा विषय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. श्री दीपक साळवे सरांनी ‘ पॉझिटिव्ह थिंकिंग’ या पुस्तकाचा परिचय करून दिला. शिक्षण परिषदेच्या शेवटी केंद्रप्रमुख श्री सुनील घुले यांनी जनगणना, ऑनलाइन कामे, निपुण चाचणी, हिंद दि चादर,वार्षिक तपासणी,शालेय पोषण आहार, लाभाच्या योजना, व्ही एस के हजेरी, मिशन आरंभ ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक श्री विठ्ठल बांडे, श्री विठ्ठल कवटे,श्री रामनाथ मुंढे, श्री भीमा कोकतरे,श्री दशरथ सोंगाळ, श्री सोमनाथ धिंदळे,श्री तुकाराम मधे, श्री युवराज तळपे, सौ. इंदिरा सगभोर,श्री गणपत भांडकोळी, श्री रमाकांत भागडे,श्री गणपत उघडे,श्री नानासाहेब नाडेकर,सौ यशोदा ढगे, श्री भरत सुकटे, श्री लक्ष्मण मुंडे, शिंदे एस जी, श्री घनश्याम नवले, महादर्पन चे प्रतिनिधी श्री संतु जाधव आदी शिक्षक उपस्थित होते.



