नवी मुंबईत महात्मा फुलें चा पुतळा उभारा- के आर चौधरी

मुंबई – नवी मुंबईत थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा पुतळा उभा करावा अशी अनेक दिवसांपासून ची मागणी आहे याबाबत बरेच दिवसापासून समाजातील सर्व थरातील लोक प्रयत्न करत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून या मागणीला यश आले नाही
संपूर्ण नव्या मुंबईत महात्मा फुले यांचा पुतळा नाही.
वाशी, सेक्टर – २९, ब्ल्यू डायमंड चौक, भगत ताराचंद्र हॉटेलच्या पुढे जो चौक आहे. त्या ठिकाणी भरपुर जागा आहे. पुतळयाच्या जवळपास नागरीकांना बसण्यासाठी भरपुर जागेची व्यवस्था होऊ शकते.
आपण महापौर या नात्याने यात स्वतः लक्ष घालून महात्मा फुलेंचा पुतळा उभे करण्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी नवी मुंबई. येथील श्री संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ चे अध्यक्ष के आर चौधरी यांनी एका निवेदना द्वारे केली आहे
हा विषय गांभिर्याने घेऊन पुतळा उभा करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करत समता परिषदेचे वतीने सौ. देवकी शिंदे यांनी पूर्वी दोन वेळा निवेदन दिले आहे.इतर संघटनांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदन दिले आहे नागरिकांची ही इच्छा पूर्ण करावी अशी मागणी केली आहे



