आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे….तहसीलदार गोविंद वाकडे

.
शेवगाव तालुका प्रतिनिधी :
तालुक्यातील गरडवाडी येथील यश फाउंडेशन निर्मित स्पर्धापरीक्षा केंद्र ग्रंथालयाला आज शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र वअलिबाग चे तहसिलदार . श्री. गोविंद वाकडे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी श्री त्रिंबकराव केदार यांनी गोविंद वाकडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गरड यांनी केले. परिसरातील प्रशस्त, सुसज्ज अशी भव्य ग्रंथालय यश फाउंडेशन अहमदनगर यांच्या वतीने साकारून ग्रामीण भागातील विद्यार्थांना प्रशासकीय, आयटी , इंजिनियर्, बँक, वकिली व्यवसाय सह अन्य क्षेत्रातील संधीचा फायदा घेऊन यश संपादन करावे आणि गावाचं, देशाचं नाव जगाच्या इतिहासात अजरामर कराव अशा हेतूने उभारणी केली आहे हे प्रास्ताविकातून राजेन्द्र गरड यांनी मांडले.
गोविंद वाकडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,”जीवनात आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे”, शालेय शिक्षण घेतांना विदयार्थी आहे , चौथी आणि सातवी मधील ज्ञानोदय सारख्या बौद्धिक क्षमताचे विवीध परीक्षांमध्ये सहभागी होऊन वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. आपल्याकडील आहे त्या परिस्थितीत अभ्यास साधनांचा योग्य वेळेवर उपयोग करुन जीवनाचे लक्ष वेधून घ्यावे. पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करून मोबाईल,इंटरनेट, युटूब सारख्या व्यसानापासुन दुर करावे. गरडवाडी सारख्या छोट्याशा खेड्यात ग्रंथालय सारख्या रोपट्याचे रूपांतर मोठया वृक्षात म्हणजेच महाराष्टातील विवीध पदावर विराजमान असणारे भावी अधिकारी नक्कीच यातून तयार होतील असा दृढ विश्वास व्यक्त केला. तर या स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राला पाच हजार रुपयेची पुस्तके भेट देऊन विवीध क्षेत्रांतील पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांना आमंत्रित करून आपल्या गावातील विद्यार्थांना योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करू असा विश्वास दिला. यावेळी विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री निलेश वाकडे आणि सामजिक कार्यकर्ते पत्रकार शहादेव वाकडे यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तर कार्यक्रमाचे आयोजन संजूभाऊ केदार यांनी केले तर विष्णू भाऊ गरड ,प्रा. वसंत देशमुख सर, गणेश गरड ,सतीश केदार, राजेंद्र गरड रघुनाथ गरड ,त्रिंबक गरड ओमकार गर्जे,गौरव अभिषेक आंधळे, दिशा केदार ,साईराज केदार ,चेतन सांगळे ,ओमकार गरड ,कार्तिक गरड, अथर्व पंडित शुभम देशमुख ,युवराज केदार सुरज केदार, सार्थक गरड शुभम केदार ,वसुदेव गरड ,भैया देशमुख, प्रणव देशमुख, कोमल बोरुडे सह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन जयकुमार देशमुख यांनी केले…