आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१४/०३/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २३ शके १९४७
दिनांक :- १४/०३/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति ०८:११,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २८:४९,
योग :- वरीयान समाप्ति १०:४३,
करण :- बव समाप्ति २०:४९,
चंद्र राशि :- धनु,(०९:३३नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू.भा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- रवि – मीन २५:०२,
शुभाशुभ दिवस:- स. ०८नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:४० ते ११:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुकमुहूर्त — सकाळी ०८:१० ते ०९:४० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:३८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
रवि मीन २५:०२, मु. ४५ समर्घ, घबाड २८:४९ नं., भद्रा ०८:११ प., एकादशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २३ शके १९४७
दिनांक = १४/०३/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
मानसिक व्यग्रता जाणवेल. ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका. काही वेळेस शांत राहणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात ठेवा. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ
घरगुती कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल.
मिथुन
कामे मनाजोगी पार पडतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल. दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल.
कर्क
आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कामात चंचलता आड आणू नये. वरिष्ठांचा शब्द मानावा लागेल. मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देवू नका.
सिंह
सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.
कन्या
सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.
तूळ
प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे. वाहन विषयक कामे निघतील. आरोग्यात सुधारणा होईल.
वृश्चिक
कामाचा विस्तार वाढवावा. जवळच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. दिवस खेळीमेळीत जाईल.
धनू
प्रवासात सावध राहावे. नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसतांना पैसे खर्च करू नका. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.
मकर
पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. उगाचच चिडचिड करू नये.
कुंभ
जास्त खोलात जाऊन चौकशी कराल. आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. काही गोष्टीत धूर्तपणे वागावे लागेल. योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.
मीन
चंचलतेवर मात करावी. मुलांचा हट्ट पुरवाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



