खिरविरे येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन संपन्न

घोडसरवाडी चा वळू ठरला चॅम्पियन.
अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे येथे भैरवनाथ यात्रा उत्सव मंडळ व मुंबईकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भैरवनाथ यात्रा उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यातआला.
दरवर्षीप्रमाणे भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. घोडसरवाडी(समशेरपुर ) येथील लक्ष्मण रामा घोडसरे यांचा वळू यंदाचा चॅम्पियन ठरला.खिरविरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून चॅम्पियन वळूचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भैरवनाथ नवचैतन्य प्रतिष्ठान ग्रामस्थ खिरविरे यांनी श्री खेड भैरवनाथ येथुन ज्योत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी डांगी जनावरांचे खरेदी विक्री व्यवहार नोंदणी केली.त्यानंतर रात्री देवाचा जागर भैरवनाथ प्रसन्न जागरण गोंधळ पार्टी पाडोशी यांचा मल्हारीचा कार्यक्रम झाला.भगवान भैरवनाथ मांडवाचा कार्यक्रम व क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले महिला लेझीम पथक आकर्षक ठरले.जाणता राजा मित्र मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

भव्य अशी भगवान भैरवनाथ व जोगेश्वरी मुखवटे काठीचा मिरवणूक काढण्यात आली.रात्री अश्विनी पुणेकर सोबत बाळासाहेब बेल्हेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा बहारदार असा कार्यक्रम साजरा झाला.त्यानंतर भव्य डांगी जनावरांची स्पर्धा बक्षिस वितरण तसेच भव्य जंगी कुस्ती हंगामा संपन्न झाला.यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून यात्रा उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा केला.
यावेळी उपस्थित पंचक्रोशीतील ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ महिला वर्ग उपस्थित होते.
परिसरातील बातम्यांसाठी हा ग्रुप जॉईन करा
👇👇👇



