माका येथे शृंगऋषिगडाच्या नारळी सप्ताहाचे धर्मध्वजारोहण

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
: पवित्र श्री शृंगऋषिगडाच्या द्वितीय ‘अखंड हरिनाम नारळी सप्ताहा’चा ध्वज उभारणी सोहळा माका येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, लेखक गोवत्स गुरुवर्य राधाकृष्ण स्वामी महाराज, गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री, महंत जनार्धन स्वामी महाराज यांच्यासह स्वामी विविध संत-महंतांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.

यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सजविलेल्या रथातून संत- महंतांची मिरवणूक काढण्यात आली. ध्वजारोहण सोहळ्यावेळी टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तीपूर्ण वातावरणात विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. या
भव्य सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली
होती. या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने २४ एप्रिलपासून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. यामध्ये पहाटेची काकड आरती, श्री गणेश महाराज
वारंगे यांची श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी व एकनाथी
भागवत पारायण, गाथा भजन, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने तसेच हरिजागर आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
सप्ताहाच्या काळात दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी या धार्मिक सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन, कीर्तनश्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शृंगऋषिगड संस्थानचे गुरुवर्य महंत सुरेशानंद महाराज, सप्ताह समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.




