आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०८/०४/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १८ शके १९४८
दिनांक :- ०८/०४/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४३,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १९:०२,
नक्षत्र :- मूळ अहोरात्र,
योग :- वरीयान समाप्ति १७:१०,
करण :- विष्टि समाप्ति –:–,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३१ ते ०२:०४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१९ ते ०७:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:२५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१० ते ०६:४३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
भद्रा १९:०२ नं., यमघंट अहोरात्र,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १८ शके १९४८
दिनांक = ०८/०४/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
अती श्रमाचा थकवा जाणवेल. खोट्याचा आधार घेऊ नका. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवा. आपल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. नवीन कामांना गती येईल.
वृषभ
सामाजिक कार्यात मदत नोंदवाल. दिवस घरी गडबडीत जाईल. घरगुती कामासाठी प्रवास कराल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. कष्टाला पर्याय नाही.
मिथुन
गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. पत्नीची प्रेमळ साथ लाभेल. क्षणिक सौख्याने खुश व्हाल. सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.
कर्क
अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक चंचलता जाणवेल. मनात नवीन इच्छा जागृत होईल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. लेखन कार्य चांगल्या प्रकारे करता येईल.
सिंह
कामानिमित्त प्रवास घडेल. सहकार्यांवर तुमचा दबदबा राहील. मान सन्मानास पात्र व्हाल. कलेला भरभरून दाद मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
कन्या
क्षुल्लक गोष्टींचा ताण घेऊ नका. आपले मानसिक स्वास्थ्य आपणच जपावे. कामात द्विधावस्था आड आणू नये. जोडीदाराचे मत विचारात घ्या. परोपकाराची जाणीव ठेवावी.
तूळ
नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
वृश्चिक
घरगुती वातावरण प्रसन्न असेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कामाचा व्याप वाढता राहील. नवीन व्यावसायिक योजना अमलात आणाव्यात. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
धनू
ताण मुक्तीसाठी ध्यानधारणा करावी. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मुलांचे भरभरून कौतुक कराल. कामातून उत्तम समाधान लाभेल.
मकर
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल. योग्य अंदाज बांधता येईल. सर्व गोष्टी चौकसपणे विचारात घ्याल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल.
कुंभ
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. आपले मत उत्तम रित्या मांडाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने नवीन कामे हाती घ्याल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
मीन
नवीन गोष्टींमध्ये उत्सुकतेने रस घ्याल. कामात तत्परता दिसून येईल. कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल. हातून एखादे सत्कार्य घडून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



