इतर
खंडित वीजपुरवठ्या मुळे सोनई कराच्या घश्याला कोरड!

सोनई प्रतिनिधी–- नेवासा तालुक्यातील पिण्याची पाणी योजना गेल्या २० दिवसापासून विजेच्या लपंडाव मुळे पाणी योजनेत समावेश असणाऱ्या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनई व परिसरातील विजे अभावी शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे,मुळाउजव्या कालव्यातून नुकतेच शेतीसाठी रोटेशन सोडले असून त्यातील पोटचाऱ्या देखील सोडल्या नसल्याने शेतीला पाणी नाही,जनावराचे सुद्धा पाण्यापासून हाल होत आहे.
सोनईत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने महिला,पुरुष सकाळी सकाळी पाण्यासाठी वणवण चालू आहे.या कारभार विरुद्ध मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात भासत असल्याने शेतातील पिके जळण्याच्या स्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे, किमान कालव्यातून पोटचाऱ्या सोडून काही काळ वीजपुरवठा चालू ठेवावा,अशी मागणी होत आहे.
पाण्याची जारची मोठी विक्री पिण्याचे पाणी जार सध्या १५,२० रुपयाला झाल्याने दारोदार जारचे पाणी विक्रीला जोर आला आहे, त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असताना नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे.जार च्या पाण्यामुळे आजारात मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे*
लांडेवाडी, पाणसवाडी,धनगरवाडी, गणेशवाडी आदी परिसरात विजेच्या लपांडव मुळे व मुळा उजवा कालवा सुरू झाला असून पोटचाऱ्या न सोडल्याने शेतकरी शेती करण्यास मेटाकुटीला आला आहे,असे चित्र पहावयास मिळत आहे.
शेतकरी वर्ग यांनी कर्ज घेऊन पिके घेतली आहे, ती कधी नैसर्गिकरित्या आपत्ती येऊन नुकसानीची शक्यता आहे, उभी असलेली पिके काही कारणाने धोक्यात येऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे, पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे, अजून उजव्या कालव्यातून पोटचाऱ्या सोडल्या नाही,त्यामुळे शेतकऱयांच्या शेतापर्यंत पाणी न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वीज वितरण कंपनी च्या अडेलतंटूमुळे मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव चालू आहे, यामुळे रात्रभर यासाठी जागवे लागत आहे, या परिसरातील पाणी आहे तर वीज नाही,वीज आहे तर पाणी गायब,असा प्रकार सुरू आहे, धरण उशाला आणि कोरड घश्याला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
अवघ्या दोन महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला तरी धरणातील पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे,त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.