इतर

ओडिशातील 10,000 वीज कंत्राटी कामगार पुन्हा कामावर.

31 / 05 / 2026

ओडिशा

ओडिशातील वीज उद्योगातील खाजगीकरणाचा फटका बसल्याने तेथील 10,000 वीज कंत्राटी कामगार हे टाटा पॉवर कंपनीने कमी केले होते.

खर्चात कपात व्हावी या साठी या 10,000 कंत्राटी कामगारांची कपात करावी अशा सूचना देणाऱ्या ओरिसा वीज नियामक आयोगाचे चेअरमन प्रदीप कुमार जेना IAS यांनी आता राजीनामा दिला.

ओडिशा राज्यातील वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या रोजगार सुरक्षा व उपजीविकेच्या संरक्षणासाठी भारतीय मजदूर संघाने दि.18 मे 2026 पासून सुरू केलेला ऐतिहासिक संघर्ष यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.

ओडिशा चे मुख्यमंत्री ना. मोहन माजी, भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी आणि आंदोलक प्रतिनिधी यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर खालील महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली

कोणत्याही वीज कंत्राटी कामगाराची कपात केली जाणार नाही.यापूर्वी प्रभावित झालेल्या कामगारांच्या प्रकरणांचा सहानुभूतीपूर्वक व न्याय्य पद्धतीने विचार करण्यात येईल.
या बाबतीत लवकरच ओडिशा सरकार, टाटा पॉवर कंपनी व भारतीय मजदूर संघ पदाधिकाऱ्यांसह मिटींग आयोजित करण्यात आली असून प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहेत.

भारतीय मजदूर संघाचे प्रभावी नेतृत्व आणि देशभरातील सर्व कामगार संघटनांनी दिलेल्या एकजुटीच्या पाठिंब्याचा हा परिणाम आहे. या आंदोलनात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे अखिल भारतीय सरचिटणीस सचिन मेंगाळे तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी भुवनेश्वर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला व कामगारांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

महासंघाच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री, ओडिशाचे मुख्यमंत्री तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून या प्रश्नात सकारात्मक हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे यांनीही माननीय मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती.

या संघर्षाला देशभरातील विविध राज्यांतील वीज कामगार संघटना तसेच विविध क्षेत्रांतील कंत्राटी कामगार संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आयोजित निदर्शने, निवेदने आणि समर्थन आंदोलने यामुळे हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आणि व्यापक जनमत निर्माण झाले.
या ऐतिहासिक आंदोलनामध्ये भारतीय मजदूर संघ, ओडिशाचे अध्यक्ष बादल महांती, महामंत्री पृथ्वीराज पंडा, अंजली पटेल, कंत्राटी कामगार प्रभारी श्रीनिवास राव, सत्यब्रत स्वाईन, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे अखिल भारतीय सचिव, ओडिशा ठेका कामगार संघटनेचे प्रमुख नेते कमलेश महापात्र, महासचिव कपिलेश्वर महापात्र, अध्यक्ष मलय परिडा तसेच भारतीय मजदूर संघ, ओडिशाचे विविध पदाधिकारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

तसेच चर्चेच्या प्रक्रियेत पिपिलीचे आमदार आश्रित पटनायक, इतर जनप्रतिनिधी, भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते व सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते.
हा विजय पुन्हा एकदा सिद्ध करतो की, देशातील कोणत्याही राज्यातील कामगारांवर अन्याय झाल्यास सर्व राज्यांतील कामगार संघटना एकत्रितपणे संघर्ष उभारतात आणि संघटित शक्तीच्या बळावर यश संपादन करतात असे मनोगत अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ महामंत्री सचिन मेंगाळे व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केले आहे .

राज्यांमध्ये उद्भवणाऱ्या कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावरील समन्वित व एकात्मिक कृतीचे महत्त्वही या संघर्षाने अधोरेखित केले आहे.
“कामगार एकता-राष्ट्रीय ऐक्य-कामगारांचा विजय” हा संदेश या आंदोलनातून अधिक बळकट झाला आहे.
अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ ओडिशातील सर्व वीज कंत्राटी कामगार, आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी, भारतीय मजदूर संघ तसेच या ऐतिहासिक संघर्षाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राज्य संघटनांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button