डॉ.व्ही व्ही पोपेरे ICCA इंटरनॅशनल कंटेंट क्रिएटर नॅशनल अवॉर्ड ने सन्मानीत

मुंबई दि 2 – Film Mora Media Network, मुंबई (भारत) यांच्या वतीने मुंबई डोमेस्टिक एअरपोर्ट, सहारा हॉटेल येथे ICCA International Content Creator National Award Ceremony 2026 मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला
या भव्य पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी चित्रपट अभिनेत्री सौ. उल्का गुप्ता (Kerala Story Fame), पद्मश्री कालूराम भामनिया , भारतीय क्रिकेटपटू (IPL T20) श्री. सुदेश नाहिर , ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेते श्री. निर्मल सोनी , अभिनेते श्री. सम्राट सोनी , हिंदी चित्रपट अभिनेते श्री. आनंद बलराज (राम लखन चित्रपट) तसेच Film Mora Media Network चे संस्थापक-अध्यक्ष श्री. अखिलेश सिंग उपस्थित होते.

यावेळी आदिवासी सेवक डॉ. व्ही. व्ही. पोपेरे तथा भारत-नेपाळ मैत्री फोरम वैश्विक परिषद, नवी दिल्ली चे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या उल्लेखनीय समाजसेवेबद्दल ICCA International Content Creator National Award 2026 प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ.पोपेरे यांचे शहरी तसेच ग्रामीण भागातील आदिवासी, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीच्या क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या समाजहित कार्याची दखल राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी व जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे.
डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांचे या राष्ट्रीय सन्मानाबद्दल
डॉ . राजीव पाल अध्यक्ष, भारत-नेपाळ मैत्री फोरम वैश्विक परिषद, नवी दिल्ली (भारत), ॲड. हरेन्द्र राय यादव,अध्यक्ष, भारत-नेपाळ मैत्री फोरम, नेपाळ आदी सह अनेक मान्यवरां नी अभिनंदन केले आहे



