इतर

आदिवासी भागातील समस्यांबाबत जी एस मूर्ती यांची घेतली भेट

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
आण्विक एवं भौतिकशास्त्र क्षेत्रातील महर्षी गणल्या जाणाऱ्या जी एस मूर्ति यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यक्तीनी सदिच्छा भेट घेऊन वेगवेगळ्या विषयांवर विस्तृतपणे चर्चा केली.

त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार असेल विविध नवीन प्रकल्प उभारणी असेल, आरोग्याबाबत समस्या,असतील महिला सशक्तिकरण असेल, कुपोषित बालकांचे वर्गीकरण असेल, ग्रामीण आदिवासी भागामध्ये विविध प्रकल्प उभारून रोजगार उपलब्ध करून देणे याबाबत काही विषय व आदिवासी समाजामध्ये होणाऱ्या बोगस शिरकावाबद्दल अशा विविध महत्त्वाच्या विषयावर केंद्रीय स्तरावर आण्विक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या तथा पंतप्रधानाच्या विश्वासातील शास्त्रज्ञां यांची विजन इंडिया अध्यक्ष श्री स्वप्निल वाडेकर , समाजभूषण डॉ. वाळीबा पोपेरे, वैदर्भीय युवा नेते श्री वैभव गोल्हर, श्री सुनील चव्हाण व इतर अनेक मान्यवरांनी भावी कार्याबाबत सखोल चर्चा करून कार्यक्रमाची आखणी केली.


याप्रसंगी मूर्ती जी द्वारा डॉ.पोपेरे यांनी केवळ महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये इंग्रजी या भाषेमध्ये तीन पुस्तक उपलब्ध करून दिली आहेत. हे साहित्य क्षेत्रातील फार मोठे योगदान आहे. व राज्यामध्ये आदिवासींच्या कल्याणाकरिता 100 कलमे धोरणांची अंमलबजावणी केलेली आहे.असे विविध जाती धर्मातील व प्रामुख्याने आदिवासी समाजासाठी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विशेष कौतुक करण्यात आले. तसेच आदिवासी क्षेत्रातून दिल्ली येथे एक लोकप्रतिनिधी जाणे आवश्यक आहे. डॉ.पोपेरे यांच्या कार्याची दखल घेऊन नक्कीच त्यांना केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी एक हुशार,अनुभवी व सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या नवयुग तरुणाची आवश्यकता असल्याने डॉ. पोपेरे यांना एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी जातीने लक्ष देणार आहे. व दिल्ली येथील प्रमुख मान्यवरांकडे पाठपुरावा करणार आहे असे मत माननीय मूर्ती यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button