केंद्रीय निवासी शाळेत दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या!

कोतुळ। प्रतिनिधी
कोतुळ परीक्षा केंद्र अंतर्गत येथील केंद्रीय निवासी आश्रम शाळेतील उपकेंद्रा वर दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती मुख्याध्यापिका सुप्रिया भाऊसाहेब गीते यांनी दिली
या परीक्षा केंद्रावर 15 मार्च पासून परीक्षा दहावीची परीक्षा सुरू झाली होती आज चार मार्च रोजी दहावीच्या परीक्षेचा अखेरचा पेपर पार पडला कोव्हिडं १९ नियमांचे पालन करत या परीक्षा सुरळीत पार पडल्या कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत दहावीच्या तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली उपकेंद्र प्रमुख म्हणून सुप्रिया गीते, परीक्षा प्रमुख म्हणून एस डी लांडगे ,एस एस वाकचौरे, एस डी आंबरें आर एन देठे यांनी काम पाहिले

कोव्हिडं १९ चे शासकीय नियमांचे पालन करून तणावमुक्त वातावरणात या परीक्षा पार पडल्या या केंद्रीय निवासी आश्रम शाळेतआदिवासी मुला मुलींना पहिली ते दहावी पर्यंत सर्व निवासी शैक्षणिक सर्व सोयी सुविधा मोफत दिल्या जातात आदिवासी दुर्गम भागातील कोतुळ परिसरातील अनेक खेड्यातील आदिवासी मुला मुलींना केंद्रीय निवासी आकश्रम शाळेत मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याचे संस्थचे संस्थापक भाऊसाहेब गीते यांनी सांगितले
——–//—–