राजापूर महाविद्यालयात सर्प ओळख, समज गैरसमज व सर्पदंश व्यवस्थापन” या विषयावर कार्यशाळा !

संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नुतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर (तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर) येथे दिनांक 4 एप्रिल, 2022 रोजी एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा “सर्प ओळख, समज गैरसमज व सर्पदंश व्यवस्थापन” या विषयावर पार पडली. या कार्यशाळेसाठी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन रुरल युथ डेव्हलपमेंट सोसायटी संगमनेर चे संचालक विवेक दातीर सर यांनी केले. या कार्यशाळेदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेची सुरुवात केली. कार्यशाळेचे आयोजन प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका देशमुख शितल नागनाथ, IQAC Co-ordinator डॉ. संगीता जांगीड मॅडम , Sub – Coordinator प्राध्यापिका हासे सविता (घोलप), प्राध्यापक सुभाष वर्पे व सहकारी प्राध्यापक खान शाहरुख यांनी केले. विज्ञान विभागातील तसेच महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागातील शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग दाखवला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका देशमुख शीतल मॅडम व प्राध्यापक सुभाष वर्पे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका सविता माधव हासे( घोलप) यांनी केले.