आमदार लहामटे यांच्या हस्ते मवेशी येथे १५ कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ!

अकोले प्रतिनिधि
आमदार डॉ किरण लहामटे यांचे हस्ते अकोले तालुक्यातील मवेशी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला
आदिवासी आश्रमशाळा (इंग्रजी माध्यम )शालेय इमारतीचे बांधकाम करणे – ५९४ लक्ष.
शासकिय आदिवासी आश्रमशाळा बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम करणे – २८२ लक्ष.
शासकिय आदिवासी आश्रमशाळा वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे – ६४५ लक्ष. अशा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शरद कोंडार, स्वप्नील धांडे, रामदास भांगरे, मारुती जाधव, सिताराम भांगरे, मारुती भांगरे, प्रवीण कोंडार आदी कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार लहामटे यावेळी म्हणाले की अकोले तालुक्यात विकासाचा अनुशेष भरून काढू विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले