इतर

निलिमाताई पवार यांना यंदाचा नाशिक भूषण पुरस्कार!

शुक्रवारी पुरस्काराचे वितरण !

नाशिक प्रतिनिधि

या वर्षी रोटरी क्लब ऑफ नासिक यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा नाशिक भूषण पुरस्कार नाशिक येथील म.वि.प्र. संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती. निलिमाताई पवार याना
देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.00 वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ नासिक हि एक अग्रगण्य सेवाभावी संस्था असून गेल्या ७७ वर्ष पासून नाशिक मध्ये अविरत काम करीत आहे , अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थेने राबवले आहेत, ज्या मध्ये गरजूंना शिक्षण देणे, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे , शौचालय बांधून देणे , रोजगार निर्मिती होईल असे कौशल्य प्रशिक्षण देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना , चाइल्ड अँड मदर हेल्थ , एडुकेशन , वॉटर अँड सॅनिटेशन , प्रोमोटिंग पिस इत्यादी क्षेत्रात हि संस्था कार्यरत आहे.

समाजभिमुख उपक्रमां बरोबरच समाजातील विविध स्तरावरील उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना गौरवण्याचे आणि त्याने कौतुक करण्याचे काम देखील रोटरी क्लब ऑफ नासिकच्या वतीने करण्यात येते..याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून नाशिक भूषण हा अतिशय मानाचा पुरस्कार सहकार, शैक्षणिक, शासकीय, सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय , कृषी ,पर्यावरण इत्यादी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि त्यांच्या कार्याने नाशिकच्या लौकिकात आपल्या कार्याने भर घालणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल प्रदान करून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या अश्या अतुलनीय योगदानाने नाशिकचे नाव एका नव्या उंचीवर नेले अश्या व्यक्तींना हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो.

हा पुरस्कार प्रमुख पाहुणे श्री. हेमंत टकले ( माजी विश्वस्त आणि सल्लागार – कुसुमाग्रज प्रतिष्ठान , अध्यक्ष नॅब इंडिया ) यांच्या शुभ हस्ते दिला जाणार असून, श्रीमती लीना बनसोड ( जिल्हा परिषद नाशिक – मुख्य कार्यकारी अधिकारी ) यांची प्रमुख उपस्थिति या पुरस्कार सोहळ्यास असणार आहे.

पुरस्कार्थी निलिमाताई पवार या शेतकरी कुटूंबातून लहानच्या मोठ्या झाल्या , फर्ग्युसन कॉलेज पुणे मधून त्यांचं शिक्षण झाले आणि नंतर डॉ वसंतराव पवार यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. २०१० मध्ये डॉ वसंतराव पवार यांना देवाज्ञा झाली आणि एक मोठा आघात निलिमाताई वर झाला परंतु अश्या कठीण प्रसंगातून त्यांनी स्वतःला सावरले आणि १५ दिवसातच म.वि.प्र. संस्थेची धुरा सांभाळली , त्यांच्या नेतृत्वाखाली म.वि.प्र. संस्थेची भरभराट झाली ४५० शाखा २ लक्ष विध्यार्थी ,आणि ५०० कोटींचं बजेट असलेली मोठी संस्था त्यांच्या अधिपत्याखाली दिमाखात उभी आहे. के. जि. पासून पी.जी. पर्यंत सर्व अभ्यासक्रम म. वि. प्र. मध्ये उपलब्ध आहेत.डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर त्यांनी पुढाकार घेऊन उभे केले व नावलौकिकास आणले. बहुजन हिताय , बहूजन सूखाय हे ब्रीद वाक्य सार्थ करीत निलिमा ताईच्या कामाचा अश्वरथ अजूनही जोमाने घौडदौड करित आहे. अशा त्यांच्या योगदानाबद्दल नाशिक भूषण पुरस्कार समितीने यंदा त्यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.
गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ व रोख रुपये ११०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराची निवड नाशिक भूषण पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष रोटे डॉ.राजेंद्र नेहेते व त्यांचा अध्यक्षे खालील निवड समिती मधील सदस्यांनी केली आहे.

सर्व नाशिककरांना या सोहळ्याला आमंत्रण असून या कार्यक्रमास सर्व नाशिककरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा डॉ श्रीया कुलकर्णी सचिव मंगेश अपशंकर, लोकसंपर्क डायरेक्टर सुधीर जोशी, यांनी काल पत्रकार परिषदेत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button