इतर

त्या ऑडीओ क्लिपच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यात कडकडकीत बंद!

मंञी गडाख यांच्या स्वियसहाय्यकांवर गोळीबार प्रकरणी कारवाई,व ना.शंकरराव गडाख ,पुत्र उदयन गडाख यांना ठोकून टाकण्याची अॅडिओ क्लिप प्रकरणी निषेधार्थ सोनई सह पाणसवाडी,वंजारवाडी, गाव कडकडीत बंद.


सोनई–[ विजय खंडागळे]

जिल्ह्याचे जेष्ठनेते माजी खासदार यशवंतराव गडाख – पाटील यांचे सुपूञ शिवसेनेचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंञी शंकरराव गडाख यांच्या स्वियसहाय्यकावर गोळीबार झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसात राज्याचे मंञी शंकरराव गडाख – पाटील व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख – पाटील यांना जिवे ठार मारण्यासाठी इस्ञायली बनावटीचे २० पिस्टल घेवून आलो आहे ,आमच्या नादी लागण्याचीच आम्ही फक्त वाट पाहून आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही घरात जावून ठोकून टाकु अशी अॅडिओ क्लिप सोशल मिडियातून प्रसारित झाल्यामुळे मंञ्याच्या स्वियसहाय्यकांवर गोळीबार प्रकरचा निषेध नोंदवीत आज नेवाशात कडकडीत बंद पाळण्यात आला


तालुक्यात कायदा व सुव्यवस्था जिवंत आहे की,नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युवा नेते उदयन गडाख यांना संरक्षण देण्याची मागणीही केली आहे.ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक तालुक्याची ओळख वारंवार घडणाऱ्या विविध कारणांमुळे बदनामीची झालर तालुक्याला लागली आहे. गृहखात्याने पडद्याआड राहून अवैध धंदे, दादागिरी करून ,गुन्हेगारी वाढू पाहणाऱ्याचा बंदोबस्त करून गुन्हेगारीचा नायनाट करणे गरजेचे आहे .आरोपी पकडून अश्वासन नको कृती करा,असा संतप्त सवाल यावेळी केला.मुख्य सूत्रधार ऋषिकेश शेटे यांच्यासह संशयित तपास करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.नेवाशाचा बिहार होण्याचा अधिक धोका नाकरता येत नसल्याचे तालुक्यात घडणाऱ्या घटनांवरुन ही बाब सप्रमाण सिद्ध होतांना दिसून येत आहे.
या वेळी सरपंच धनंजय वाघ,युवा कार्यकर्ते उदय पालवे,माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, यांच्यासह व्यापारी पंचायत समितीचे सदस्य कारभारी डफळ, किरण चंगेडिया,सह पदाधिकारी, ग्रामस्थ,उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button