ग्रामीण

गणोरे सेवा सोसायटी ची निवडणूक प्रक्रिया सुरू जाहीर…

सुशांत आरोटे

गणोरे प्रतिनिधी


अकोले तालुक्यातील राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी गणोरे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे

एकूण तेरा (१३) संचालक निवडून द्यायचे आहे. त्यात प्रामुख्याने सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी मधून एकूण आठ (८), अनुसूचित जाती जमाती मधून एक (१),महिला वर्गातून दोन (२),इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक (१), भटक्या विमुक्त जाती / जमाती / विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक (१ ) असे एकूण तेरा (१३) संचालक प्रतिनिधी निवडून द्यावयाच्या आहेत. आढळा विभागातील सर्वात मोठी आणि राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या सेवा सहकारी सोसायटी माध्यमातून गावातील प्रत्येक घटकातील नागरिकांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सेवा सहकारी सोसायटीत संबंध येत असतो. गावातील विविध प्रकारच्या योजना,पीक कर्ज , अन्न धान्य,विविध शासकीय योजना,अनुदाने, इ. बाबत नागरिकांचा सहभाग असतो. परंतु मतदान करताना सोसायटीच्या सभासदांना मतदानाचा हक्क जरी असला तरी सर्व घटकांचा यात प्रभाव दिसून येत असतो. मग यात धान्य, रेशन कार्ड,अनुदान, इत्यादी बाबत नाराजी ,समाधान या सर्व घटकांचा समावेश होतो.
निवडणुकीचा कार्यक्रम हा दिनांक २९/४/२०२२ ते ५/६/२०२२ पर्यंत असून प्रथमत अर्ज विक्री ही दिनांक २९/०४/२०२२ ते ६/५/२०२२ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जांची छाननी ही दिनांक ९/५/२०२२ रोजी कार्यालयात होईल. वैध नामनिदर्शन पात्रांची यादी जाहीर ही १०/५/२०२२ रोजी होईल.अर्ज माघारी घेणे दिनांक १०/५/२०२२ ते २४/५/२०२२ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत होईल. दिनाक २४/५/२०२२ रोजी कार्यालयात चिन्ह वाटप करण्यात येईल.आणि प्रत्यक्ष मतदान हे ५/६/२०२२ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत होऊन त्याच दिवशी मत मोजणी होऊन त्याच ठिकाणी लगेच निकाल जाहीर करण्यात येईल. मतदानाचे ठिकाण आणि मतमोजणीचे ठिकाण नंतर ठरवण्यात येईल.
अशा प्रकारे अकोले तालुक्यातील आणि आढळा विभागातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी विविध सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आल्याने गावचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे अनेकांनी निवडणूकिसाठी बाशिंग।बांधले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button