ज्या क्षेत्रात करियर करायचे आहे , ते क्षेत्र निश्चित करा.– अप्पर आयुक्त डॉ.विजयकुमार

अकोले प्रतिनिधी-
तुम्हाला ज्या क्षेत्रात करियर करायचे आहे , ध्येय गाठायचे आहे ते क्षेत्र निश्चित करा.व अगदी मनापासून ते ध्येय गाठण्याचा ठरवा. आणि तुम्ही स्वतःला ओळखा तेथेच तुमचे 60 टक्के काम मार्गी लागलेले असेल असे प्रतिपादन विभागीय अप्पर आयुक्त( आय.ए. एस.) औरंगाबाद डॉ.विजयकुमार फड यांनी केले. ते अकोले येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे युवा प्रबोधन विभागांतर्गत आयोजित करियर गाईडन्स व विद्यार्थी पालक समुपदेशन या विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत श्री येवले सर व औरंगाबाद चे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी श्री डहाळे,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले चे मार्गदर्शक संजय हुजबंद ,तालुका प्रतिनिधी श्री लांडगे सर हे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी शिकत राहिले पाहिजे.विद्यार्थी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, विद्यार्थी हा विनयशील असावा,दणकट असावा,आपल्या क्षेत्रात रमणारा असावा. त्याने स्वतःचे मानसिक दारिद्र्य स्वतःच्या विरुद्ध लढून घालावे.आपले युद्ध स्वतः शी असावे,आपली तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतः शीच करावी.आपले डोळे मुलींकडे लावून बसण्यापेक्षा स्वतः च्या आई बापाच्या,भाऊ बहिणीच्या डोळ्यातील स्वप्नाकडे लावून बसावे. तुमच्यावर आता जबाबदारी स्वतः बरोबर कुटुंबाची,समाजाची आहे लक्षात ठेवावे.वेळेचे महत्व ओळखा,10 रुपयाच्या वड्यासाठी एक तास घालू नका,एकेक सेकंद महत्वाचा तुमच्यासाठी महत्वाचा आहे.कारण निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.कोणाला काय वाटेल याचा विचार करू नका,तुम्हाला काय वाटते त्याकडे लक्ष द्या.मोबाईल चा अतिवापर टाळा.छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही पंक्चर होऊ नका.50 लाखाची गाडी एका पंक्चर मुळे बिन कामाची होते हे लक्षात नेहमी ठेवा.आई वडिलांचे स्वप्न भंग करू नका.प्रत्येक घटनेतून शिकण्यासारखे खूप आहे, त्या घटनेवर प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तरे मिळाली की,तुमचे ज्ञान वाढणार आहे.कोणालाही तुच्छ लेखू नका,कारण ती व्यक्ती सुद्धा तुम्हाला ज्ञान देऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इ.पहिली ते बारावी पर्यंत ची सर्व पुस्तके वाचा,त्यानंतर इतर पुस्तके वाचा,त्याची चिंता करण्याऐवजी चिंतन करा,पाठांतर करा.या जगात अशक्य काहीच नाही.जी जागा आहे ती फक्त तुमच्यासाठीच आहे,हे ध्यानात ठेवून अभ्यास केला तर यश निश्चित आहे.परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी मनस्थिती आपल्या हातात आहे.मनस्थिती स्थिर राहू द्या,त्यात एकाग्रता वाढवा कोणतीही अडचण येणार नाही.कमवता कमवता शिकला तर जगण्याची व जीवनात हरण्याची भिती वाटणार नाही.पालकांनी मुले आपली संपत्ती आहे असे समजून त्यांच्याशी वागा,त्यांना घडविताना त्यांच्यावर रागावू नका,त्यांच्यासाठी जागे रहा.त्यांना यशस्वी होण्यासाठी जे पाहिजे ते पुरवा. यावेळी डॉ. विजयकुमार फड यांनी अनेक उदाहरणे देऊन सर्वाना वास्तविकतेची जाणीव करून दिली, संतज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांच्या ओव्यांचे दाखले देऊन सर्वाना मंत्र मुग्ध केले. तसेच स्वतः ची उदाहरणे देऊन कसा घडत गेलो याचीही उदाहरणे दिली. यावेळी डॉ.विजयकुमार फड यांनी ब्र. भू. मोरेदादा आध्यत्मिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेची पाहणी केली. स्वागत व प्रास्ताविक संजय हुजबंद यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी केला.सूत्रसंचालन प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार मनाली रासने यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक,महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते.