”शिवाजी कोण होता” हे पुस्तक महाराष्ट्रतील ५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प!

संगमनेरात पुस्तक वाटून जयंती साजरी
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेरात राष्ट्रसेवादल – छात्रभारती , दुर्वे नाना पतसंस्था यांच्या वतीने स्वातंत्र सैनिक यांची जयंती शिवरायांचे पुस्तक वाटून साजरी करण्यात आली
स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या 103 व्या जयंती निमित्त सौ मथुराबाई थोरात विद्यालय घुलेवाडी , भाऊसाहेब थोरात विद्यालय विद्याभवन अमृतनगर , महात्मा फुले विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालय घुलेवाडी या ठिकाणी शिवाजी कोण होता या कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाटप करण्यात आले .
दुर्वे नानाची ओळख संगमनेर मध्ये गरिबांचे वकील म्हणून आजही कायम आहे . सामाजिक राजकीय जीवनात नानाचे योगदान अतिशय मोठे आहे .महाराष्ट्रातील 5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत शिवाजी कोण होता हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प केला आहे .

हा उपक्रम जिल्हा परिषद सदस्य ,दुर्वे नाना पतसंस्थेचे चेअरमन ,सीताराम राऊत यांच्या मदतीने पार पडला.या वेळी राष्ट्रसेवादलाचे तालुकाध्यक्ष सुनीता राऊत ,ऍड बाळासाहेब राऊत , मथुराबाई विद्यालयाचे प्राचार्य गुंजाळ बी बी सर ,महात्मा विद्यालयाचे प्राचार्य जगताप सर ,भाऊसाहेब थोरातमाध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हस्के मॅडम ,
छात्रभारती चे राज्य संघटक अनिकेत घुले ,जिल्हाध्यक्ष राहुल जऱ्हाड ,तालुकाध्यक्ष तृप्ती जोर्वेकर ,श्वेता शेटे ,सानिया शिंदे ,राष्ट्रसेवादलाचे संघटक बजरंग जेडगुले ,ओंकार बिडवे ,ग्रामपंचायत सदस्य दिलीप पराड आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते .
