राजुर चे उपसरपंच गोकुळ कानकाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमातुन साजरा !

आग दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला संसारपयोगी साहित्याची भेट
रुग्णवाहिके साठी ११ हजाराची मदत
राजूर प्रतिनिधी
राजूर ग्रामपंचायत चे उपसरपंच व येथील प्रतिष्टीत व्यावसायिक व पत्रकार गोकुळ कानकाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला
दिनांक 5 मे 2022 रोजी श्री गोकुळ कानकाटे यांचा वाढदिवस होता या निमित्ताने अकोले तालुक्यातील शेनित या गावातील हेलम कुटुंबाचे घराला आग लागून नुकसान झाले होते यामुळे या कुटुंबाला कानकाटे यांनी त्यांना संसारोपयोगी साहित्य मदत केली तर येथील माणुसकी फाउंडेशन यांना अंबुलन्स च्या मदतीसाठी अकरा हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून सुपूर्द केला गोकुळ कानकाटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाच्या निमित्ताने मदतीचा हात दिला हेमलताताई पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी त्यांच्या या कार्याचा गौरव करून वाढदिवसानिमित्त गोकुळ कानकाटे यांचा सत्कार केला या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी राजुर गावचे सरपंच गणपतराव देशमुख माजी सरपंच संतोष बनसोडे प्रशासक दिनकर बंड बाळासाहेब लहामगे विजय पवार पत्रकार शांताराम काळे राजेंद्र जाधव ललित चोथवे सोसायटीचे व्हा चेअरमन शेखर वालझाडे पत्रकार विनायक घाटकर वकील दत्ता निगळे रंगनाथ केळकर विलास तुपे संजय येलमामे राजेंद्र पराड हर्षल सोनार अण्णा पाबळकर ,गणेश पंडित, नंदू कानकाटे, बालचंद भडांगे, बाळासाहेब चोथवे ,अल्पेश मेहता, पत्रकार राजेंद्र टीभे, राजेंद्र चोथवे ,यशवंत चोथवे, जगन्नाथ मुर्तडक अशोक वराडे, गोरख आल्हाट ,रामा मुतडक ,अंकुश मुतडक ,राजू मणियार ,शिवाजी लहामंगे ,झंपा चांडोले ,शांताराम मधुरकर, आदींच्या उपस्थित गोकुळ कानकाटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला सूत्रसंचालन अविनाश बनसोडे तर आभार किरण कानकाटे यांनी मानले