
अकोले /प्रतिनिधी
अकोले मेडिकल फाउंडेशन व डॉ बंगाळ बाल रुग्णालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने आज परिचारिका दिवस अकोले येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश वाकचौरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य होते.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये समर्पित भावनेने सेवा करत असलेल्या परिचारिकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
कोविड काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांना नेत्रदीपक काम केले. परिचारिका यांनी आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र रुग्णांची सेवा केली,याकामी परिचारिका यांचे मोठे योगदान राहिले आहे. डॉकटर्स यांना मोलाची साथ दिली.अनेक रुग्णांना मदत केली.प्राण वाचविले.याकाळात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले.डॉक्टर्स,परिचारिका यांनी अडचणीच्या काळात सेवाभाव जोपासत रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. खऱ्या अर्थाने ही सर्व यंत्रणा कोविड योद्धे आहेत.त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे,त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणे हा मेडिकल फाउंडेशन चा उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे अमोल वैद्य यांनी सांगितले.
या कार्यक्रमास डॉ हर्षदा दर्शन बंगाळ, डॉ कल्याणी सुदाम आरोटे ,गौरी गणेश नवले, श्री दत्तात्रय गव्हाणे, डॉ गणेश नवले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव सौ रुपाली वाकचौरे यांनी मानले.