राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. १५/०५/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४४
दिनांक = १५/०५/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.

वृषभ
कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.

मिथुन
जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा.

कर्क
अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्‍यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता.

सिंह
सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

कन्या
जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.

तूळ
स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.

वृश्चिक
वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.

धनू
भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

मकर
काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो.

कुंभ
क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा.

मीन
बदल लक्षात घेऊन  वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.

🙏🏻🙏🏻

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४४
दिनांक :- १५/०५/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५४,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १२:४६,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति १५:३५,
योग :- व्यतीपात समाप्ति ०९:४८,
करण :- विष्टि समाप्ति २३:१८,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- प्रतिकूल दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:१७ ते ०६:५४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:११ ते १०:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:२६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:४० पर्यंत,

❀ दिन विशेष:-
पुष्टिपति विनायक जयंती, अगस्ति लोप, कुलधर्म, पुण्यकाल सूर्योदय ते १२:३५, अन्वाधान, भद्रा १२:४६ नं. २३:१८ प., पौर्णिमा श्राद्ध,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button