पठारवाडी सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व कायम

विजयराव औटी, सभापती काशिनाथ दाते यांनी केला नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील सेवा सोसायटी संस्थेचे निवडणूक पार पडली यामध्ये शिवसेना पुरस्कृत भैरवनाथ सहकार पॅनलने दणदणीत १३/० विजय मिळवला व सत्ता कायम ठेवली राष्ट्रवादी प्रणित भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा पराभव झाला.
यावेळी नवनिर्वाचित संचालक सुखदेव बबन पठारे, मारुती महादू सुपेकर, गुलाबराव गणपत पठारे, अनिल उमाजी सुपेकर, अनिल भाऊ सुपेकर, किरण सदाशिव सुपेकर, सिद्धेश्वर महादू पठारे, ज्ञानदेव किसन पवार, महिला प्रतिनिधी – जयवंताबाई किसन सुपेकर, मनीषा जयसिंग पवार ओबीसी राखीव – खंडू नामदेव बोदगे अनुसूचित जाती प्रतिनिधी – भिमाबाई महादू गजरे भ.वि.जातीजमाती मागास प्रवर्ग – हनुमंत कनका भोसले निवडून आलेले असून नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, सभापती काशिनाथ दाते सर व पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला शिवसेना पुरस्कृत भैरवनाथ सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेना उपतालुका प्रमुख किसनराव सुपेकर, पिराजी दत्तू पवार, सरपंच भास्कर सुपेकर, दगडु नाना सुपेकर यांनी केले तर जयसिंग पवार, शंकर बोदगे, विठ्ठल पठारे, गोरख पठारे, मंगेश बोदगे, दीपक सुपेकर, मोहन पवार, अनिल औटी, गणेश पवार, भानुदास पठारे, बाबाजी पठारे, भाऊ शिंदे, विठ्ठल बोदगे यांनी सहकार्य केले
———–