माका सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी रघुनाथ पागिरे, तर व्हाईस चेअरमन पदी जबाजी पांढरे

दत्तात्रय शिंदे माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका येथील,विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या सन 2022ते 2027च्या निवडणुकीत रघुनाथ विशवनाथ घुले यांच्या नेतृत्वाखाली13जागांपैकी सर्वच निवडुनआलेल्या सदस्यांतुन एकमताने संस्थेच्या चेअरमनपदी रघुनाथ रेवन्नाथ पागीरे तसेच व्हा.चेअरमनपदी जबाजी गंगाराम पांढरे यांची निवड करण्यात आली असून,सेवा संस्थेच्या माध्यमातून,गावचे सरपंच नाथा विश्वनाथ घुले व अनिल रघुनाथ घुले यांच्या सहकार्याने विविध विकास कामे कर ण्यात येणार असल्याचे पागीरे यांनी चेअरमन नियुक्ती वेळी सांगितले याबाबत सदस्य त्रिंबक धूराजी दारकुंडे,अनिल रघुनाथ घुले,मल्हारी रामभाऊ आखाडे,बाळासाहेब दौलत भानगु डे,संजय गंगाधर गाडे,सुरेश श्रीपती तवार,बेबीताई बाबा साहेब कोकाटे,लताबाई श्रीधर लोंढें,साखरबाई सुभाष घु ले,सतिश लिंबराज पटेकर,आबासाहेब सूर्यकांत पालवे यांनी सर्वनवनिर्वाचित सदस्यांनी एकमताने चेअरमन व्हा.चेअरमन पदाची निवड केली. यासंदर्भात या निवडणुकीबाबत विशेष नेतृत्व गावचे माजी सरपंच गंगाधर मोहन भुजबळ,यादव नाना शिंदे, रघुनाथ विश्वनाथ घुले,एकनाथ कारभारी भुजबळ,अशोक विश्वनाथ खेमनर,श्रीधर मारुती लोंढें,दिगंबर म्हातारदेव शिंदे,तसेच संबधित सभासद ग्रामस्थ,व तरुण वर्गातुन परीश्रम घेतले गेले असुन निवडिबाबतचे पत्र संबधित निवडणुक अधिकारी डि.टी.महाजन यांनी दिले असुन,या प्रसंगी सचिव संतोष सांगळे,कर्मचारी दिगंबर शिंदे,बाबा काळुसे,सिताराम रुपनर,तसेच इतर सहकारी वर्ग उपस्थित होते.
