क्राईम

खोऱ्याचा दांडा डोक्यात टाकून ,पत्नीचा खून करणारा फरार पती अखेर गजाआड !

      विलास तुपे

राजूर / प्रतिनिधी
पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला राजूर पोलिसांनी अखेर पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेत शिताफीने गजाआड केले फिर्यादी मुलगा जालिंदर जगन्नाथ आडे याने राजुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती, दिनांक 19/05/2022 रोजी सकाळी 8.00 वा. ते दि.20/05/2022 रोजी सकाळी 6.30 वा चे दरम्यान  माझे वडील जगन्नाथ भागा आडे राहणार -शेलविहिरे, तालुका -अकोले यांनी सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून माझी आई रंजना जगन्नाथ आडे हीस राहते घरामध्ये लाकडी दांडके व टणक हत्यारने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले या तक्रारीवरून राजुर पोलीस स्टेशन  गुन्हा रजिस्टर नंबर 99/2022 भा द वी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रीमती स्वाती भोर, अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अकोला पोलीस स्टेशन, नरेंद्र साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा घडले ठिकाणी तात्काळ भेट दिली.

. उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर  राहुल मदने यांनी उपविभागातील पो ना / आण्णसाहेब दातीर, पोकॉ/ अमृत आढाव, पोकॉ / सुभाष बोडखे, पोकॉ / प्रमोद गाडेकर, पोकॉ / गणेश शिंदे  नेम. उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय, संगमनेर, पोना / फुरकान शेख ने. सायबर सेल अप.पो.अधि. कार्यालय, श्रीरामपुर, यांचे तपास पथक तयार करुन त्यांना नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या.         सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक तपास वरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी जगन्नाथ भागा आडे हा रांजणगाव, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे वास्तव्य करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री राहुल मदने, उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांचे तपास पथक रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे रवाना होऊन सदर परिसरातील जवळपास 15 चाळी,  लॉजेस, हॉटेल, मेस व रेस्टॉरंट येथे आरोपीचा शोध घेतला. स्थानिक लोकांना आरोपीचे फोटो दाखविले असता फोटोतील आरोपी हा , एका खोलीमध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून राहत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी राहत असलेल्या ठिकाणी नमूद पथकाने सापळा लावून त्यास रांजणगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.         आरोपी जगन्नाथ भागा आडे (वय 46 वर्ष) यास गुन्हा बाबत विचारपूस करता त्याने त्याची पत्नी रंजना जगन्नाथ आडे हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृण पणे खून केल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी देखील आरोपीने पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर हल्ला करून तीस गंभीर दुखापत केली होती. त्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस न्यायालयाने दहा वर्षाचा कारावास देखील सुनावला होता. आरोपी सदर शिक्षा भोगून सन 2011 मध्ये बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी संसार थाटला होता. दोघे सुखाने संसार करत असताना दिनांक 19/05/2022 रोजी दुपारी 01-30 वाचे सुमारास पुन्हा चारित्र्याचा संशय या कारणावरून पत्नीशी वाद करू तिचे डोक्यात खोरे व टिकाव दांड्याने व तुंबा ने वार करून तीस जीवे ठार मारले .
 आरोपी  जगन्नाथ भागा आडे (वय 46 वर्षे,) रा. शलविहरे, ता. अकोले  याचे विरुद्ध यापूर्वी ही1) राजुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.     12/2003 भा.द.वि.कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपी यास मा. न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यांचा अधिक तपास नरेंद्र साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन हे करत आहे.
———-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button