नाशिक येथे रोटरी मातृ-दुग्ध पेढी चे शानदार सोहळ्यात उदघाटन !

नाशिक प्रतिनिधी
आईचे दूध नवजात बालकांना जीवनदायी असतेच शिवाय जीवनदायी पोषक तत्त्वे प्रदान करते हे सांगायला नकोच. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली आहे की बाळाच्या जन्मापासून ते सहा महिने वयापर्यंत केवळ आईचेच दूध बाळास पाजावे.
पण काही वेळा अशी परिस्थिती असते जेव्हा अर्भक हे अमृत देणाऱ्या जीवनापासून अर्थात दुधापासून वंचित असते.
जसे, बाळाच्या जन्मावेळी मातेचा मृत्यू होतो, अपूर्ण दिवसांची बालके, किंवा काही गुंतागुंतीमूळे आईचे दूध अपुरे मिळते आणि अशी अनेक कारणे असू शकतात .अशा सर्व उदाहरणांमध्ये एकमेव उपाय म्हणजे इतर मातेचे पाश्चराईज केलेले दूध अर्भकाला उपलब्ध करून देणे. हे बोलणे सोपे आहे पण कार्यात उतरवणे अवघड.आजच्या काळात तंत्रज्ञान खूप कामी आले आहे. सर्वसाधारणपणे, प्रत्येक आईला देवाने अतिरिक्त दुधाची भेट दिली आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे दूध काढणे, त्याची चाचणी घेणे आणि नंतर ते कुपोषित किंवा गरजू अर्भकाला देणे शक्य होते.ह्युमन मिल्क बँक नेमके हेच करते. हे दूध दान करण्यास इच्छुक असलेल्या स्तनदा मातांना एकत्र आणते, ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवते आणि नंतर ज्यांना त्याची नितांत गरज आहे अशा बालकांना ते देते.
या बाबतीत रोटरीने पुढाकार घेतला. स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ सदस्य आणि एक उच्च पात्र डॉक्टर अध्यक्ष म्हणून, रोटरी क्लब ऑफ नाशिकने नाशिकमध्ये अशीच एक मानवी दूध बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे जीवनाला आधार देणाऱ्या मातेच्या दुधाची गरज असलेल्या अर्भकांना आणि कुटुंबांना मदत करेल.रोटरी क्लब ऑफ नासिक व नाशिक रोटरी चारीटेबलें ट्रस्ट ने हि गरज ओळखून योग्य तो सर्व अभ्यास करून नाशिक मधील पहिली मातॄ- दुग्ध बँक सुरु करणायचा निर्धार केला आणि मग सी.एस.आर. योजने अंतर्गत नाशिक मधील एम.एस.एल.ड्राइव्हलीन सिस्टिम लिमिटेड या कंपनी बरोबर सामंजस्य करार करून या रोटरी वात्सल्य मातृ-दुग्ध पेढी स्थापन केली ,या साठी नाशिक च्या सिविल हॉस्पिटल ने सुद्धा मदतीचा हात पुढे करून या प्रोजेक्टला जागा उपलब्ध करून दिली , तर प्रोजेक्ट चे प्रोमोशनल पार्टनर म्हणून नाशिक मधील फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनीही पुढाकार घेऊन मदत केली , या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले आणि आज ३० मे २०२२ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या शुभहस्ते या रोटरी मातृ-दुग्ध पेढी चे शानदार सोहळ्यात उदघाटन झाले
.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची उपस्थिती होती.एम.एस.एल. ड्राइव्हलीन सिस्टिम लिमिटेड चे श्री भूषण पटवर्धन , फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड चे श्री.जॉय अलूर , मायक्रोलॅब च्या डॉ सपना शिंदे,डॉ रुपाली राजदेव ,एम.पी.जी.आय. चे श्री सुहास पाटील , एम.पी. जी. आय. विद्यापीठाचे प्रमुख श्री झा , सिविल हॉस्पिटल चे डॉ पंकज गाजरे , रोटरी क्लब चे माजी प्रांतपाल किशोर केडीया ,महेश मोकळकर ,पुढील रोटरी वर्षाचे निर्वाचित प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनवाला , अशा वेणुगोपाल , संजय कलंत्री , रवी महादेवकर , मुग्धा लेले , विनायक देवधर ,मंगेश अपशंकर ,प्रफुल बरडीया , उदयराज पटवर्धन , मनीष चिंधडे , अनिल सुकेणकर ,डॉ हितेंद्र महाजन , तसेच रोटरी क्लब चे अनेक पदाधिकारी ,सभासद आणि नाशिक मधील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी या मातृ दुग्ध पेढी बद्दल सविस्तर माहिती दिली , त्या पाठीमागचा उद्देश , दुग्ध पेढी यशस्वी सुरु राहण्या साठी घेतल्या गेलेल्या सर्व महत्वाच्या केलेल्या कामाबद्दल हि त्यांनी माहिती दिली आणि या दूध पेढी च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा डॉ श्रीया कुलकर्णी यांनी हि या पेढी च्या सुरळीत कामकाजासाठी काय काय उपाय योजना करण्यांत आल्या त्याबद्दल माहिती दिली. डॉ.सूचेता मालवतकर यांनी आभारप्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता केली.