अगस्तीचे संचालक अशोकराव देशमुख यांच्या प्रवरा पतसंस्थेकडून सत्कार!

अकोले प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकते श्री.अशोकराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या
अशोकराव देशमुख यांच्या रुपाने उंचखडक गावाला व अकोले तालुक्याला चांगले चळवळीचे नेतृत्व मिळाले असे सांगत श्रीं देशमुख यांनी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी अनेक आंदोलन करून आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक लढे उभारले असे यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन भास्कराव मंडलिक यांनी सांगितले
श्री अशोकराव देशमुख यांनी यावेळी संस्थेच्या वतीने झालेल्या सत्कारा बद्दल आभार व्यक्त करून संस्थेच्या कामकाजाला शुभेच्छा देत पतसंस्था चळवळ अधिक बळकटीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन भास्करराव मंडलीक, संचालक रामनाथ शिंदे, दिलीप मंडलिक विजय अभंग व कर्मचारी उपस्थित होते
—/////—