राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०४/०६/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ १४ शके १९४४
दिनांक = ०४/०६/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. गोडीने सर्वांना आपले मत पट‍वून द्याल. आर्थिक चिंता दूर होईल.

वृषभ
स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल. काही कामे क्षुल्लक कारणास्तव रखडली जातील.

मिथुन
जलद गतीने कामे पूर्ण कराल. क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल. किरकोळ अडचणीमुळे खट्टू होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

कर्क
तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील. कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे.

सिंह
आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.

कन्या
जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

तूळ
केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

वृश्चिक
रेस, जुगारातून धनलाभ संभवतो. अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

धनू
व्यापारातून चांगला नफा संभवतो. पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.

मकर
तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो. अविचाराने  निर्णय घेऊ नका.

कुंभ
मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमून जाल. कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा. आवडते पदार्थ खायला मिळतील.

मीन
मुलांवरील खर्च वाढू शकतो. जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

🙏🏻🙏🏻

🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठा १४ शके १९४४
दिनांक :- ०४/०६/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २८:५३,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २१:५५,
योग :- धृव समाप्ति २८:१९,
करण :- बव समाप्ति १५:५०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – रोहिणी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:१० ते १०:४९ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:३२ ते ०९:१० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०६ ते ०३:४५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४५ ते ०५:२३ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
घबाड २८:५३ नं.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button