पारनेर येथे दिव्यांग अपंग साहाय्यक साधने वाटप तपासणी शिबिर

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
पारनेर शहरामध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतुन व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने पारनेर या ठिकाणी दिव्यांग अपंग व्यक्तींसाठी साहाय्यक साधने वाटप तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. पारनेर तालुक्याच्या विविध भागातून दिव्यांग अपंग बांधव मोठ्या संख्येने या शिबीराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील मा. जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी ही योजना नगर दक्षिण व प्रामुख्याने पारनेर तालुक्यांमध्ये प्रभावीपणे राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून आज अनेक दिव्यांग अपंग ज्येष्ठ व्यक्तींना लाभ होत आहे.
हे समाज उपयोगी काम चांगले आहे. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. भाऊसाहेब खिलारी पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, भाजपा पारनेर तालुका अध्यक्ष वसंतदादा चेडे, राहुल शिंदे पाटील, भाजपा पारनेर शहर अध्यक्ष किरण कोकाटे, भाजपा युवा मोर्चा पारनेर सरचिटणीस सागर मैड,
पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब हरीभाऊ चेडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते संभाजी आमले, युवा नेते कैलास कोठावळे, सरपंच मनोज मुंगसे, काशिनाथ नवले, बबनराव आतकर, पोपट लोंढे, राहुल विखे पाटील तसेच सर्व भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.