ओ.बी.सी समाजाचे सोमवारी राहुरीत धरणे आंदोलन

राहुरी प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात होत असलेल्या फसवणुकीच्या विरोधात सर्व ओ.बी.सी संघटनेच्या वतीने सोमवारी राहुरी तहसील येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओ बी सी ची माहिती संकलित करण्यासाठी मा. भाटीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित गठीत केला आहे. सदर आयोग मा. सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असलेल्या इंम्परिअल डाटा घरोघर जाऊन ओ बी सी ची खरी आर्थिक सामाजिक राजकीय स्थितीची माहीती संकलित होणे अपेक्षित होते. परंतु आमचे असे निर्देशनास आले की नमुद आयोग वरीलप्रमाणे माहिती संकलित न करता सॉप्टवेअर द्वारे व आडनांवानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलित करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉप्टवेअर समाजाची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाची भविष्यात कधीही भरून न येणारे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे.
या कारणासाठी राज्यशासनाचे आमच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व ओ.बी.सी संघटना व बारा बलुतेदार संघटनेच्या वतीने सोमवार दि.२० जून रोजी १०.०० तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या आंदोलनामध्ये सर्व ओबीसी समाज व बाराबलुतेदार समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महात्मा फुले जयंती उत्सव समिती राहुरी , संत सावता माळी युवक संघ, नाभिक संघटना, सुवर्णकार संघटना, राष्ट्रवादी ओ.बी.सी सेल, कासार समाज संघटना, लोहार समाज संघटना, सुतार समाज संघटना,तिळवण तेली संघटना, शिंपी संघटना,यशवंत सेना, वीर लहुजी प्रतिष्ठान,गुरव संघटना, चर्मकार विकास संघ व सर्व ओ.बी.सी संघटना आदीनी केले आहे.