टाकळी ढोकेश्वर येथे बाबासाहेब खिलारी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा!

दत्ता ठुबे/ पारनेरप्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे प्र. ग. खिलारी पाटील कन्या माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन ऍड. रघुनाथ ऊर्फ बाबासाहेब खिलारी पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या नाश्त्याची नियमितपणे त्यांनी व्यवस्था केली असून ऍड. खिलारी यांनी वाढदिवसानिमित्त हा चांगला निर्णय घेतला टाकळी ढोकेश्वर येथील कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींची संख्या मोठी असून त्यांच्या साठी सामाजिक उपक्रम ऍड. खिलारी यांनी राबवला आहे. यावेळी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रम प्रसंगी टाकळी ढोकेश्वर येथील कन्या विद्यालयांमध्ये उपस्थित होते.
यावेळी सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे किन्ही येथील मा. उपसरपंच सिताराम पाटील देठे, ज्येष्ठ पत्रकार बबनराव गायखे सर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आंधळे, शालेय व्यवस्थापन समितीचे पंडितराव झावरे, मा. मुख्याध्यापक प्रकाशराव इघे सर,पत्रकार गणेश जगदाळे, मुख्याध्यापक ढूस एस. के. , कर्ण रोकडे सर तसेच विद्यालयातील शिक्षक रुंद कर्मचारी रुंद हे यावेळी उपस्थित होते. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी एडवोकेट खिलारी यांनी मी प्रयत्नशील आहे असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, बबन गायखे सर, प्रकाशराव इघे, कर्ण रोकडे सर यांनी ऍड. बाबासाहेब खिलारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.