राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. २६/०६/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०५ शके १९४४
दिनांक :- २६/०६/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २७:२६,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १३:०६,
योग :- शूल अहोरात्र,
करण :- गरज समाप्ति १४:१७,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- तिथून १३ दिन,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:२९ ते ०७:०८ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१४ ते १०:५३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:३२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:११ ते ०३:५० पर्यंत,

❀ दिन विशेष:-
प्रदोष, भद्रा २७:२६ नं.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०५ शके १९४४
दिनांक = २६/०६/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात स्थैर्य आणावे लागेल.

वृषभ
दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो.

मिथुन
आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.

कर्क
जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका. संपर्कातील लोकांच्यात आपली माणसे ओळखा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह
हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामाला अपेक्षित गती येईल. आजचा दिवस चांगला जाईल.

कन्या
मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

तूळ
अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक
तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.

धनू
आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक चिंता सतावतील.  अतिविचारात भरकटू नका. घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल. दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.

मकर
वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावे. छंद जोपासण्यात वेळ घालवा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ
मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. आर्थिक कामे जपून करावीत. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.

मीन
बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button