बायफचे जितीन साठे यांना वसंतराव नाईक पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर….

अकोले प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन एक जुलै रोजी वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो
.यावर्षी कै. वसंतराव नाईक यांचा १०९ वा जन्मदिवस व कृषी दिन साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे निमित्ताने राज्यातील कृषी संलग्न विविध क्षेत्रात ल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा व संस्थानचा गौरव करण्यात येत असतो. यावर्षी या पुरस्कारासाठी बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांचे निवड वसंतराव नाईक पर्यावरण मित्र पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. 35 हजार रुपये , स्मृतिचिन्ह , शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे एक जुलै रोजी डॉक्टर चारुदत्त मायी अध्यक्ष , दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्था नवी दिल्ली , अध्यक्ष कृषी वित्तीय मंडळ मुंबई यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे .मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे .
या प्रसंगी कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार जितीन साठे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील पर्यावरण पूरक शेती, जलसंधारण, वृक्ष लागवड , महिला विकास , पशुधन विकास , इत्यादी विविध उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना गौरविण्यात येत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सर्वसामान्य शेतकरी आणि आदिवासी जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बायफचे रिजनल डायरेक्टर व्ही.बी ध्यासा , राज्य समन्वयक सुधीर वागळे , बायफ संस्थेतील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी व सहकारी व अकोलेतील नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.