महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई च्या सहनिबंधक पदावर राजेंद्र देशमुख!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील सुपुत्र राजेंद्र जयराम देशमुख यांची महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई च्या सहनिबंधक या पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे
त्यांच्या निवडीचे अकोले तालुक्यात स्वागत करण्यात आले श्री राजेंद्र जयराम देशमुख हे प्रथम विशेष लेखा परीक्षक वर्ग-१(साखर)अहमदनगर या पदावर कार्यरत होते या पदावरून त्यांची महाराष्ट्र् राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई च्या सहनिबंधक पदावर पदोन्नती झाली आहे
यापूर्वी त्यांनी पुणे येथे जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ पुणे, या पदावर तर सन २०११ ते २०१५ या कालावधीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले तर सन २००३ ते २००५ या दरम्यान अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक म्हणून काम पाहिले
श्री राजेंद्र देशमुख हे पुणे कृषी बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी जे देशमुख यांचे कनिष्ठ बंधू आहे त्यांच्या निवडीचे कोतुळ सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष लहानु खरात, बापूसाहेब देशमुख, दिलीपराव देशमाने सुनील गीते, आदी सह राजेंद्र देशमुख मित्रमंडळा ने अभिनंदन केले आहे
—/——