वनकुटे परिसराच्या विकासासाठी कटीबद्ध- सुजित झावरे

घोंगडी बैठकीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
वनकुटे या गावात अनेक विकास कामे माजी आमदार स्व.वसंतराव झावरे यांच्या व
माझ्या माध्यमातून झाली आहे.या भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सात्यताने झावरे कुटुंबीय करत आले व पुढील काळात हि करत राहणार आहे.वनकुटे परिसराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले.
वनकुटे(ता.पारनेर) येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित घोंगडी बैठकीत ते बोलत होते.
यावेळी भाऊसाहेब बागुल,साहेबराव डुकरे, सुरेश डुकरे,पोपट डुकरे,भास्कर शिंदे,दिपक गुंजाळ, ऋषिकेश गागरे,गोपीनाथ गुंजाळ,बापू काळनर, राजू गागरे,दत्ता काळनर,भाऊसाहेब काळनर, संतोष गागरे,कौशिक औटी,सतीश भुतांबरे,बाळु पोकळे,गोरख बेलकर,विठ्ठल काळनर,बबन डुकरे
उपस्थित होते.
झावरे म्हणाले,की वनकुटे गावावर स्व.वसंतराव झावरेंचे विशेष प्रेम होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे वनकुटे तसेच परिसरातील गावाचा दळणळणाच्या दुष्टीने अति महत्वाचा तास ते राहुरी पुल हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला.या भागातील आदिवासी,ठाकर,धनगर,मागासवर्गीय मुला मुलींना शिक्षण मिळावे यासाठी या गावात भाऊसाहेब महाराज शिक्षण मंडळ संस्थे मार्फत प्रगत विद्यालय सुरू केले आहे.यावेळी गावातील विविध कामासंदर्भात ग्रामस्थांनी निवेदन दिले.