अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत पिचड यांचा हिशोब चुकता करणार आमदार डॉ. लहामटे

ज्या आदिवासींच्या शेअर्सवर कारखाना उभा राहिला त्यांना 28 वर्षात दिवाळीला साखर देता आली नाही
पिचडां सोबत माझीही
शेवटची निवडणूक
— अशोक भांगरे
अनेक अडचणी असतानाही कारखान्याने सर्वाधिक गाळपाने हंगाम यशस्वी केला – गायकर
सुनील गीते
अकोले दि ८
शरद पवार पवार साहेब आणि अजित दादा पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहे त्यांच्यामुळे अकोले तालुक्यात गावा गावात रस्त्याच्या विकासाची कामं सुरू आहेत सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी अकोले तालुक्याला आणला या नेतृत्वामुळेच तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली.
गेल्या अडीच वर्षात अकोले तालुक्यात मला अतिशय भरीव काम करता आली
ज्या सहकारी नेत्याने पिचड यांना साथ दिली त्यांचे धोतर तुम्ही वेशीवर टांगले त्याचा हिशोब अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत चुकता करणार असल्याचे प्रतिपादनशेतकरी समृद्धी विकास मंडळाचे अध्यक्ष व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले

अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकीच्या शेतकरी समृद्धी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ आज अकोले येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते
पिचड यांनी नेहमी सुडाचे राजकारण केले विकासाचे आणि पाण्याचे नियोजन करता आले नाही तसे झाले असते तर अगस्ती आज सुस्थितीत असता अकोले सिन्नर रस्ता दोन पदरी करता आला नाही अगस्ती कारखाना चालवण्याची क्षमता फक्त गायकर साहेबां मधेच आहे ज्या सहकारी नेत्याने तुम्हाला सांभाळले त्या नेत्याचे धोतर तुम्ही वेशीवर टांगल्या चा निंदनीय प्रकार केला त्याचा हिशेब या निवडणुकीत चुकता होणार आहे आपल्या सहकाऱ्याची इतकी विटंबना करतात तर सामान्य जनतेच्या बाबतीत आपले काय प्रेम आहे हे जनतेला समजते उत्पादक सभासदांना ज्याप्रमाणे दीपावलीला साखर देतात त्याप्रमाणे आदिवासी सभासदांना का दिली नाही ज्या आदिवासींच्या शेअर्सवर कारखाना उभा राहिला त्यांना न्याय देता आला नाही 28 वर्षात आदिवासी लोकांचा भावनिक दृष्ट्या वापर केला 28 वर्षात अगस्ती सहकारी कारखाना पिचड यांनी सुस्थितीत आणायला पाहिजे होता ती त्यांची जबाबदारी होती त्यांनी व्यवस्थित चालवला नाही आणि आता ते कारखान्यासाठी आपली गरज असल्याचे सांगत आहे असा आरोप आमदार डॉ लहामटे यांनी केला
ते पुढे म्हणाले की सामान्य जनतेची नाळ आहे अशी माणसं शेतकरी समृद्धी विकास मंडळाकडे आहे तुमचे राजकारण मतलबी आहे कोरोना काळात अकोल्यात पन्नास लाख रुपये औषधांसाठी दिले आपण मात्र घरात लपून बसले मधुकर पिचड ची शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या साठी ही भाग्यलक्ष्मी चालली पाहिजे पिचड यांना यात पुन्हा एन्ट्री देऊ नका कप बशीच्या चिन्हा समोर फुली मारून शेतकरी समृद्धी मंडळाचा सर्व उमेदवारांना निवडून द्या कारखान्याचा डॉक्टर कोण आहे हे ओळखून कारखाना चालवणारा शेतकरी समृद्धी पॅनल निवडून द्या असे ते लहामटे म्हणाले

सिताराम पाटील गायकर यावेळी बोलताना म्हणाले की अगस्ती कारखाना ही शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी आहे ती वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ अगस्ती वाचविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावू राज्यात सर्वत्र कारखानदारी अडचणीत असतानाही अगस्ती कारखान्याने यावर्षीचा हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करून विक्रमी गाळप केले जिल्हा बँकेच्या सहकार्यामुळे हे करता आली पॅनल कडे जिल्हा बँकेचे तीन संचालक असल्याने यापुढे कर्जाची अडचण येणार नाही काहीही झाले तरी कारखाना बंद होऊ देणार नाही असे सिताराम पाटील गायकर यांनी सांगितले
आमच्यावर खूप टीका झाली हे टोळीचे राजकारण करतात या टोळीने तुम्हाला दहा वर्ष मनापासून सांभाळले व्यक्तिगत टीका आम्ही दोन वर्षे सहन केली परंतु यातून बाजूला झालो तर कारखाना बंद पडेल याचे खापर गायकर यांचेवर येईल म्हणून शेतकरी समृद्धी मंडळाच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहोत 25 वर्ष मंत्रिपद असतानाही त्यांनी बारकाईने कारखान्याकडे पाहिले नाही आता पुन्हा त्यांचे कडे दिला तर कारखाना बंद पडल्याशिया राहणार नाही ही शेतकऱयांची भाग्यलक्ष्मी आहे येथे वेगळा विचार केलाच पाहिजे असे गायकर म्हणाले
अशोकराव भांगरे यावेळी म्हणाले की गेल्या पाच वर्षापासून कारखाना सिताराम गायकर सक्षमपणे चालत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कारखाना चालवला यापुढील काळात देखील त्यांच्या नेतृत्व या कारखान्याला आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी सांगितले
जिल्हा बँकेने साठ कोटीचे कर्ज अगस्ती कारखान्याला दिले यासाठी अजित दादा बाळासाहेब थोरात यांनी मदत केली शरद पवार भंडारदरा येथे आले तेव्हा त्यांनी 40 वर्षातील झारीतील शुक्राचार्य ला बाजूला करण्यास सांगितले होते याची आठवण करून दिली ज्याला खाजगी दूध संघ चालवता आला नाही 55 कोटी चा प्लांट 165 कोटी ला संघाला विकला यांच्या ताब्यात कारखाना द्यायचा का असा प्रश्न भांगरे यांनी उपस्थित केला 18 तारखेला शेतकरी त्यांना घरी पाठवतील
ही तुमची माझी शेवटची निवडणूक आहे तालुक्यातील जनतेने मला तळहाताच्या फोडासारखे जपले सातत्याने पिचड यांचे विरोधात लढलो जनतेपासून दूर गेलो नाही आता या निवडणुकीत तुम्हला घरी बसावे लागेल तुमचे दिवस भरले आहे
आम्ही चांगल्या पद्धतीने कारखाना चालवू ऊस वाढवण्याच्य मागे आम्ही लागला आहे पंधरा कोटी चे लिफ्टचे कामे मंजूर आहेत आदिवासी भागात छोट्यामोट्यालिफ्ट योजना तयार करून ऊस वाढीचा कार्यक्रम राबवणार अजून दोन लाख मे टन ऊस तालुक्यात वाढवू हे असे अशोकराव भांगरे म्हणाले
या प्रसंगी कैलासराव वाकचौरे, मधुकराव नवले, डॉक्टर अजित नवले,अमित भांगरे, मिनानाथ पांडे, वसंत मनकर, विजय वाकचौरे ,विठ्ठलराव चासकर, भानुदास तिकांडे, प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजणे,सोन्याबापु वाकचौरे मंदाताई नवले, शांताराम वाळुंज, रामहरी तिकांडे आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर होते तालुक्यातील अनेक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते