इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १०/०७/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १९ शके १९४४
दिनांक = १०/०७/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
हातून एखादे चांगले काम होईल. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल.

वृषभ
हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे. अरबट-चरबट खाऊ नका. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. गोड बोलून कार्यभाग साधाल.

मिथुन
प्रसन्नता पूर्वक दिवसाची सुरुवात होईल. अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. दिवस चांगला जाईल.

कर्क
मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

सिंह
चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

कन्या
कामाची धांदल उडेल. आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.  
तूळ
धार्मिक अनुष्ठान साधाल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृश्चिक
नातलगांची गाठ पडेल. तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. मित्रांना दुखावून चालणार नाही.

धनू
मुलांच्या सौख्यात आनंद मानाल. जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल.

मकर
तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांचा विश्वास संपादन करावा.

कुंभ
नवीन कामे अंगावर येतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी.

मीन
कामात चांगली सफलता मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते.


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १९ शके १९४४
दिनांक :- १०/०७/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १४:१४,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति ०९:५५,
योग :- शुभ समाप्ति २४:४४,
करण :- बव समाप्ति २४:४८,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०२नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:३० ते ०७:०८ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१८ ते १०:५६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:३५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५२ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
शयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, बकरी ईद, एकदशी-व्दादशी श्राद्ध, घबाड १४:१४ नं., दग्ध १४:१४ नं., भद्रा १४:१४ प., मृत्यु ०९:५५ नं.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button