ढवळपुरी येथे भव्य राज्यस्तरीय घोडा शर्यत स्पर्धा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी ढवळपुरी परिसरातील धनगर बांधवांसाठी नेहमी विकासात्मक काम केले. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला व समस्या सोडवल्या. यापुढील काळात त्यांच्या या कार्याला गती देण्यासाठी शासकीय योजना धनगर बांधवांना पर्यंत पोहोचवणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की धनगर बांधवांवर झावरे कुटुंबाचे विशेष प्रेम असल्यामुळे यापुढील काळात सर्व समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
दरम्यान ढवळपुरी येथील लालूंचा तांडा धनगरवाडा येथे आयोजित राज्यस्तरीय भव्य घोडा शर्यत स्पर्धेचा शुभारंभ सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आला.
ढवळपुरी येथे भव्य घोडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पाच हजारा पेक्षा जास्त समाज बांधव ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये राहुरी, राहता, संगमनेर, अकोला तसेच विविध भागातून घोडा मालक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजित झावरे पाटील यांचे सहकारी सतीश कुलाळ यांच्या मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमासाठी बबनराव पवार, बाबाजी चौधरी, सतीश कुलाळ, पोपटराव टकले, शिवाजी खोडदे, खंडू कोळेकर, दिलीप पाटोळे, सरपंच भाऊसाहेब सैद, बाळासाहेब झावरे, दत्तात्रय गांगड, बाळासाहेब साळुंके, बाबाजी कुलाळ, रामा टकले, आप्पा कुलाळ, दशरथ झिटे, लालू करगळ, दौलत करगळ, रामभाऊ घुले, सबाजी कुलाळ, दौलत बरकडे, मोहन कोळेकर, पावसू कोकरे, सखाराम करगळ, सदा टकले, गणपत कोकरे, बापु कुलाळ, भिमा करगळ, धुळा तांबे, बाळु शिंगटे, बाळू ढेकळे, अप्पा कोकरे, पोपट करगळ, बाबाजी शींगटे, हिरामण करगळ, बिरा झिटे, दामू करगळ, बाबाजी करगळ, गंगाधर टकले, अंकुश कोकरे, बाळू करगळ, रामभाऊ ठवरे, बिभीषण करगळ, चींधू तांबे, गणेश करगळ, सोमा डोंबाळे, नामदेव कोकरे तसेच ढवळपुरी तसेच परिसरातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.