पळशी विकास कामांचा अनुशेष भरून काढणार : सभापती काशिनाथ दाते

पारनेर:प्रतिनिधी
पळशी येथील ४५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले प्रमुख उपस्थितीत होते
जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत पळशी ते जुना मळा रस्ता (ग्रामा-६७) नवीन पुलासह मजबुतीकरण करणे – १५ लक्ष, पळशी ते मधे वस्ती रस्ता (ग्रामा-१३६) मजबुतीकरण डांबरीकरण करणे – १५ लक्ष, रामा-६६, माळवाडी ते पळशी रस्ता (इजिमा-२८४) मजबुतीकरण डांबरीकरण करणे – १५ लक्ष
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले ढवळपुरी गटात शिवसेना पक्षाच्या उमेदवारास निवडून द्या पळशीचे राहिलेले सर्व विकासकामे मार्गे लावून देतो. जिल्हा परिषद मधून निधी आणण्याची काळजी करू नका माजी आमदार विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर विकास कामे केली आहेत. मी आज पर्यंत कै. शंकराव काळेंपासून ते माजी आमदार औटी साहेबांपर्यंत सर्वच आमदारांबरोबर काम केलेला असून प्रशासनाचा मला मोठा अनुभव आहे. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगतील ते सर्व विकासकामे मार्गी लावण्याचे काम आपण केले आहे. शेजारी खडकवाडी गावात जवळपास अडीच ते तीन कोटींची विकास कामे केलेली असून मी अडचणीतला अडचणीत वाढलेला कार्यकर्ता असल्याने अडचणीचे कामे मार्गे लावण्याचे काम आपण पहिल्यांदा केले यापुढेही करत राहू अशी ग्वाही सभापती दाते सर यांनी दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, विभाग प्रमुख अमोल रोकडे, माजी सरपंच मिटू शेठ जाधव, प्रकाश शिंदे, पाराजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले

: माजी आमदार विजय औटी यांनी पळशी मध्ये फार मोठे काम केले आदिवासी लोकांना जमिनी मिळून दिल्या. दाते सरांनी निधी देताना राजकारण केले नाही निवडणुकीत ढवळपुरी एमआयडीसी पुन्हा येऊ शकते, मला माहित नाही, तुम्हाला सर्व माहित आहे. सरांनी तालुक्यात प्रचंड कामे केली आहेत. चांगल्या माणसांच्या मागे उभे राहिले पाहिजे
: रामदास भोसले
शिवसेना जिल्हा उपप्रमुख
यावेळी विभाग प्रमुख अमोल रोकडे, खडकवाडी ग्राम. सदस्य विकास रोकडे, माजी सरपंच मिठू जाधव, माजी चेअरमन रामचंद्र जाधव, अशोक जाधव, गणेश शिंदे, नारायण चिकणे, सिताराम जाधव,ग्रा.प.सदस्य नितीन जाधव, संपत जाधव, पोपट सारबंदे, हनुमान वाढवणे, प्रकाश शिंदे, राजू शिंदे, बन्सी गागरे, शेखर साळवे, पठारे गुरुजी, उत्तम जाधव, बाबासाहेब मोढवे, विष्णू मधे, सुखदेव मोढवे,नामदेव जाधव, पाराजी जाधव, विजय गागरे, अजित मोढवे, गंगाराम मोढवे, विकास इंगळे, भिका सरोदे, पुना वारे, विकास गांधी, युवराज शिंदे, स्वामी शिंदे, भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब गांडाळ, स्वप्नील ढोकळे, राजू रोकडे, धनु साळवे, आकाश इंगळे, लहान वाडेकर, बाबासाहेब सुडके, वसंत वारे, बाबू घुले, नंदू साळवे, बाबासाहेब सारबंदे, पोपट मोढवे, मनाजी मधे, विठ्ठल गांडाळ, गोकुळ सारबंदे, मल्हारी सुडके, राहुल सारबंदे, आनंद बो-हुडे, चिमा काळे, कामाचे ठेकेदार साहेबराव नरसाळे, फारुख शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू साळवे यांनी केले तर आभार शिवसेना शाखाप्रमुख गणेश शिंदे यांनी मानले.